हद्दीत अडकल्या ‘लगीनगाठी’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

आळंदी - विवाहनोंदणीला नगरपालिकेने हात झटकले, तर ग्रामीण रुग्णालयाने प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे सांगत परत पाठवले. त्यामुळे सध्या आळंदीसह अनेक ठिकाणी जन्मभराच्या लगीनगाठी हद्दीच्या वादात अडकल्या आहेत. त्यामुळे महिनाभरापासून नव्या विवाह नोंदींचे काम थांबले आहे.

आळंदी - विवाहनोंदणीला नगरपालिकेने हात झटकले, तर ग्रामीण रुग्णालयाने प्रशिक्षित कर्मचारी नसल्याचे सांगत परत पाठवले. त्यामुळे सध्या आळंदीसह अनेक ठिकाणी जन्मभराच्या लगीनगाठी हद्दीच्या वादात अडकल्या आहेत. त्यामुळे महिनाभरापासून नव्या विवाह नोंदींचे काम थांबले आहे.

आळंदीत होणाऱ्या विवाहांची संख्या जास्त आहे. यापूर्वी आळंदी पालिकेत विवाह नोंदणी होत होती. त्यातच शहर वाढत असल्याने सध्या विवाह नोंदणीस गेली पाच सहा वर्षे चांगला प्रतिसाद मिळाला होता. पालिकेमध्ये प्रशिक्षित कर्मचारी होते. मात्र मागील वर्षीपासून राज्य शासनाने अध्यादेश काढून विवाह नोंदणीचे हक्क पालिकेऐवजी आता ग्रामीण रुग्णालयाला दिले. ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणीसाठी साधे अर्जही उपलब्ध नाहीत. नागरिकांनी स्वतःहून अर्ज भरून आणले, तर ग्रामीण रुग्णालयात अर्ज स्वीकारले जात नाहीत. यामुळे विवाह नोंदणी करणाऱ्यांची नोंदणी होत नाही. त्यामुळे महत्त्वाच्या अनेक कामांसाठी आवश्‍यक असणारा हा विवाह नोंदणी दाखला उपलब्ध होत नाही. दरम्यान, शासनस्तरावर विवाह नोंदणीचे अधिकारातून शासकीय रुग्णालयांना मुक्त करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. विवाह नोंदणी बंधनकारक आहे. विविध कारणांसाठी विवाह नोंदणी वधूवरांसाठी गरजेचे असतानाही पालिका आमचे नोंदणीचे अधिकार काढून घेतल्याचे सांगतात.

आमच्याकडे आळंदी आणि परिसरातील गावातून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यातच शासनाने विवाह नोंदणीचे अधिकार दिले. मात्र विवाह नोंदणी करण्याबाबतचे प्रशिक्षण नसल्याने अडचण येत आहे. जोखमीचे काम असल्याने रुग्णांची सेवा करायची, की विवाह नोंदणी असा प्रश्न पडला आहे.
- डॉ. गणपत जाधव, वैद्यकीय अधिकारी

मागील वर्षीपर्यंत आळंदी पालिका विवाह नोंदणी करत होती. मात्र शासनाने अध्यादेश काढून पालिकेची विवाह नोंदणीचे अधिकार काढून घेतले आणि स्थानिक पातळीवर ग्रामीण रुग्णालयास अधिकार दिले.
- समीर भूमकर, मुख्याधिकारी

Web Title: pimpri news alandi Marriage registration

टॅग्स