अल्पवयीन गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

देहूरोड - पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार सुभान शेख ऊर्फ शब्बीर ऊर्फ रोहिट्या अमिन सोलंकी (वय 17, सध्या रा. गांधीनगर, देहूरोड, मूळगाव विठ्ठलवाडी, देहू) याचा नऊ जणांनी दांडके व दगडाने मारहाण करून खून केला. ही घटना सोमवारी (ता. 11) रात्री साडेनऊच्या सुमारास देहूरोड येथील सेंट्रल चौकात घडली. 

पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अंकुश नरेश बिडलान (वय 19, रा. पार्शिचाळ, देहूरोड) याला अटक केली आहे. सोमवारपर्यंत (ता. 18) त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिला. सुभानचा मित्र चेतन ऊर्फ सोन्या बाळू पांडे (वय 20, रा. कुंभारवाडा, देहू) याने फिर्याद दिली आहे. सुभान हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला, मारहाण, दरोडा असे आठ गुन्हे दाखल आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सुभानने कोयत्याचा धाक दाखवून अंकुशला मारहाण केली. त्यानंतर तो गांधीनगर येथे मित्राच्या पार्टीसाठी गेला. तेथून सेंट्रल चौकात गेला. त्या वेळी अंकुश व साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला. 

Web Title: pimpri news dehuroad murder