पर्यायी रस्त्यांचा विकास महत्त्वाचाच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेतला असला, तरी या जुन्या दुखण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह हिंजवडी वर्तुळात तयार झाला आहे. त्यामुळे वाकड ते मेगा पोलिस या मुख्य रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी "म्हाळुंगे-माण-हिंजवडी' (टप्पा एक व तीन) हा रस्ता प्राधान्याने विकसित करावा, असा सूर उमटत आहे. 

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेतला असला, तरी या जुन्या दुखण्यासाठी शासकीय यंत्रणांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह हिंजवडी वर्तुळात तयार झाला आहे. त्यामुळे वाकड ते मेगा पोलिस या मुख्य रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी "म्हाळुंगे-माण-हिंजवडी' (टप्पा एक व तीन) हा रस्ता प्राधान्याने विकसित करावा, असा सूर उमटत आहे. 

हिंजवडीतील वाहतूक समस्या आणि त्यामध्ये भरडल्या जाणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडणारी "दुष्टचक्रात हिंजवडी' ही वृत्तमालिका "सकाळ'ने जुलै महिन्यात प्रसिद्ध केली. विशेषतः शासकीय स्तरावर त्याचे सकारात्मक पडसाद उमटले. त्यानंतर ही समस्या सोडविण्याच्या हालचालींना गती मिळाली. बापट यांनी जातीने लक्ष घालत हिंजवडीशी निगडित शासकीय यंत्रणांच्या एकत्रित बैठका घेतल्या. यात उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा घडल्या. कोंडीस कारणीभूत असलेले घटक तसेच पर्यायी रस्त्यांच्या विकासात येणारे अडथळे, रखडलेले प्रकल्प याचा आढावा घेतला गेला. त्यातूनच पर्यायी रस्त्यांचा विकास हा पर्याय बहुमताने पुढे आला. 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) "म्हाळुंगे-माण' रस्त्यासाठी 720 एकरांवर "टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय घेतला. यातून भूसंपादन करून ती जागा रस्ते बांधणीसाठी "एमआयडीसी'कडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव तयार झाला. दरम्यान, हिंजवडीच्या प्रश्‍नावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 11) पुन्हा एकदा बैठक झाली. त्यामध्ये पुणे महापालिका हद्दीतील (म्हाळुंगे) रस्ता रुंदीकरणासाठी संबंधित शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. त्यावरून बापट अशा शेतकऱ्यांशी स्वतः संवाद साधण्यासाठी येत्या शुक्रवारी (ता. 15) हिंजवडीचा दौरा करणार असून, यात कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले. 

गेल्या महिनाभरात शासकीय यंत्रणांची कार्यवाही  

"पीएमआरडीए' 
- म्हाळुंगे-माण रस्त्यासाठी टीपी स्कीम 
- ग्रामसभांचे आयोजन 
- 95 टक्के शेतकऱ्यांची सहमती मिळविण्यात यश 
- मेट्रोसाठी निविदा प्रक्रियेस प्रारंभ; डिसेंबरअखेरीस कामाचे आदेश 

जिल्हा परिषद 
- हिंजवडी टप्पा एक व तीनला जोडणाऱ्या पाच किलोमीटरच्या माण रस्त्याच्या रुंदीकरणास वेग 
- डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न 
- माण गावातील नदीवरील पुलाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव 

वाहतूक पोलिस विभाग 
- हिंजवडी रस्त्यावरील "टाटा टी जंक्‍शन'मध्ये पोर्टेबल सिग्नल यंत्रणेची उभारणी 
- "टाटा टी' जंक्‍शन आणि "लक्ष्मी जंक्‍शन'जवळ कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी एमआयडीसीकडे प्रस्ताव 
- विप्रो सर्कलचा व्यास कमी करण्यासाठी पाठपुरावा 

म्हाळुंगे-माण रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया डिसेंबरअखेरीस पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर ती एमआयडीसीकडे हस्तांतरित केली जाईल. 
किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए 

Web Title: pimpri news development Hinjewadi IT Park PMRDA