ख्रिस्ती बांधवांकडून ईस्टर संडे उत्साहात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पिंपरी - ‘‘जा सांगा मम बंधुजना...आलो जिंकुनिया या मरणा ! मरण जिंकिले...येशू राजाने...’’अशी भक्तिगीते म्हणत, चर्चमधील प्रार्थना आणि प्रवचनानंतर एकमेकांना ‘‘प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे,’’ ‘हॅपी ईस्टर’ म्हणत शुभेच्छा देत..अशा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात रविवारी (ता. १) ख्रिस्तबांधवांनी पुनरुत्थानाचा दिवस म्हणजेच ईस्टर संडे साजरा केला. या सणानिमित्त सुरू असलेले पवित्र सप्ताह आणि चाळीस दिवसांच्या उपवासाचीही रविवारी सांगता झाली.

पवित्र वधस्तंभावर आपले प्राणार्पण केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाले. त्याची आठवण आणि येशूने मरणावर विजय मिळविला त्यानिमित्त ईस्टर संडे साजरा केला जातो. शहरात विनियार्ड चर्च दापोडी, सेंट अँन्ड्य्रूज, सेंट मेरी खडकी, दि युनायडेट चर्च ऑफ ख्राईस्ट कामगारनगर, पिंपरीतील अवरलेडी कन्सोलर अप्लिकेटेड चर्च,  चिंचवडमधील सेंट झेवियर चर्च, काळेवाडीतील सेंट अल्फान्सो चर्च, निगडीतील इनफंट जीझस चर्च, सेंट अन्थोनी चर्च, काळेवाडीतील केडीसी चर्च ऑफ ख्राईस्ट, पिंपरी गावातील हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्चमध्ये ‘येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान’चे महत्त्व सांगणारा संदेश दिला. सर्व चर्च पहाटेपासून भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. चर्चच्या महिला मंडळाने पहाटेची ‘सर्व्हिस’ केली. शहरातील विविध चर्चमधून ईस्टरच्या पूर्वसंध्येनिमित्त शनिवारी रात्री, तसेच रविवारी विशेष उपासना विधीचे आयोजन करण्यात आले होते. ईस्टर हा प्रभू येशूप्रती आपले प्रेम प्रकट करण्याचा खास दिवस असतो. ईस्टर संडेनिमित्त शनिवारी रात्रीपासून रविवार पहाटेपर्यंत चर्च व ख्रिस्ती प्रेयर ग्रुपमध्ये भजनाचे आणि धार्मिक गीतांचे कार्यक्रम झाले.

Web Title: pimpri news Easter Sunday