फेरीवाल्यांच्या जागांसाठी आज सोडत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

पिंपरी - राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ नुसार महापालिकेच्या ‘ड’ प्रभागातील फेरीवाल्यांना जागा देण्यात येणार आहेत. त्याची शुक्रवारी (ता.२३) चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती, नागरवस्ती विभागाच्या सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी स्मिता झगडे यांनी दिली.

पिंपरी - चिंचवड महापालिकेतर्फे राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ ची शहरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील फेरीवाल्यांचे सन २०१२ मध्ये आणि उर्वरित फेरीवाल्यांचे जानेवारी २०१४ मध्ये अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर पात्र-अपात्र फेरीवाल्यांचे यादी निश्‍चित करण्यात आली. त्यातील पात्र फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांना महापालिका ‘ड’ प्रभाग कार्यालयाकडून फेरीवाला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. 

या फेरीवाल्यांना देण्यासाठी ‘ड’ प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या पोलिस लाइनजवळ, वाकड येथील कावेरीनगर रोडवर आणि राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारी, राजीव गांधीनगर समोरील जागा निश्‍चित केली आहे. शुक्रवारी या जागा क्रमाने वाटप करण्यात येणार आहे. कावेरीनगर रोडवरील जागेसाठी सकाळी अकरा वाजता, तर राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारील जागेसाठी दुपारी तीन वाजता चिठ्ठ्या टाकून सोडत करण्यात येईल. त्यासाठी संबंधित फेरीवाल्यांनी औंध-रावेत रोड, रहाटणी येथील ‘ड’ प्रभाग कार्यालय येथे दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन झगडे यांनी केले आहे.

Web Title: pimpri news hockers place draw municipal