अडीच वर्षांत मेट्रो धावणार 

ज्ञानेश्‍वर बिजले
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाला सुरवात झाल्यानंतर पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. 23) मेट्रोतर्फे विशेष कार्यक्रम पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये मंगळवारी सकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोच्या कामाची पाहणी करणार आहेत. येथील कामाचा आढावा घेतल्यानंतर ते पुढील कामाची दिशा ठरवणार आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत, त्या निमित्त घेतलेला मेट्रोच्या आजपर्यंतच्या कामाचा आढावा. 

- प्रकल्प उभारणीच्या कामाची वर्षपूर्ती 
- बालगंधर्वमध्ये विशेष कार्यक्रम 
- "महामेट्रो'कडून पिंपरीत आज पाहणी 
- पुढील कामाची दिशा ठरविली जाणार 

पिंपरी-चिंचवड शहरात 61 मीटर रुंदीच्या रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथील वाहतुकीला अडथळा न येता कामे मोठ्या गतीने सुरू आहेत. या भागातील चार स्थानकांची कामे, तसेच निम्म्यापेक्षा अधिक मार्ग येत्या वर्ष-दीड वर्षात पूर्ण होतील. मेट्रोची पहिली धावही पिंपरी-चिंचवडमध्ये होण्याची शक्‍यता आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड विभागातील पहिली मेट्रो पिंपरी महापालिका भवन ते शिवाजीनगर धान्यगोदामापर्यंत येत्या अडीच वर्षांत धावणार आहे. त्याच काळात पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठीच्या हालचाली गतिमान होण्याची चिन्हे आहेत. 

दृष्टिक्षेपात मेट्रो मार्ग 
- महापालिका भवन ते दापोडीपर्यंत सहा किलोमीटर अंतर 
- पहिल्या खांबाचे फाउंडेशन घेण्यास जून 2017 मध्ये प्रारंभ 
- जानेवारी 2018 पर्यंत 75 खांबांचे फाउंडेशन पूर्ण 
- आतापर्यंत उभारलेले खांब 32 
- खांबावर पिअर कॅप 10 
- खराळवाडी ते नाशिक फाटा व फुगेवाडी ते दापोडी दरम्यान काम सुरू 

सेंगमेंट टाकण्यास प्रारंभ 
- खराळवाडीत दोन खांबांवर पिअर कॅपमध्ये सेंगमेंट बसविण्यास सुरवात 
- दोन खांबांमध्ये सेगमेंट दहा 
- दहा सेगमेंटच्या पहिला स्पॅनची उभारणी पूर्ण 

सेगमेंट लॉंचर पंधरवड्यात 
- वाहतुकीमुळे एका रात्रीत एक सेगमेंट बसविला 
- पहिल्या स्पॅनला जमिनीवरून आधार देऊन उभारणी 
- चीनवरून सेगमेंट लॉंचर पिंपरीत दाखल 
- पहिल्या स्पॅनला वायरिंग करून सेगमेंट एकजीव करणार 
- सेगमेंट लॉंचर पंधरवड्यात बसविणार 
- सेगमेंट बसविणे सुलभ 
- एका रात्रीत पाच सेगमेंट बसविणार 
- दोन दिवसांत दोन खांबातील स्पॅनची उभारणी 
- स्पॅनच्या वरून दोन्ही मार्ग जाणार 

संत तुकारामनगर स्थानकाचे काम सुरू 
- पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते भूमिपूजन 
- स्थानकासाठी दहा खांब 
- पाच खांबांचे फाउंडेशन पूर्ण 
- पादचारी मार्गासाठी सरकते जिने उभारणीसाठी पदपथावरील पायाच्या कामाला प्रारंभ 
- दोन महिन्यांत तेथील खांबांचे काम पूर्ण 
- जानेवारी 2019 पर्यंत स्थानक उभारणार 

तीन स्थानकांची कामे लवकरच 
- कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी स्थानकांची कामेही लवकरच सुरू 
- ग्राउंड पेनिस्ट्रेशन रडारच्या (जीपीआर) साह्याने जमिनीची तपासणी पूर्ण 
- महापालिका हद्दीत एकूण सहा स्थानके 
- भोसरी व महापालिका भवन येथील स्थानके शेवटच्या टप्प्यात 

मुळा नदीपात्रात खांब 
- दोन हॅरिस पुलांमधील जागेत मेट्रोचे खांब 
- मुळा नदीपात्रात दहा खांब 
- पहिल्या खांबासाठी जमिनीच्या सपाटीकरणाला प्रारंभ 
- मेपर्यंत पाच खांबांची उभारणी 
- पावसाळ्यानंतर डिसेंबरमध्ये पुढील खांबांचे बांधकाम 

खडकीमध्ये अडचणी 
- संरक्षण दलाकडून जागा मिळण्यास विलंब 
- 22 मीटरचा रस्ता असल्याने वाहतुकीला अडथळा 
- पुणे महापालिकेकडून काही भागात रस्ता रुंदीकरणास सुरवात 
- दोन महिन्यांत मेट्रोच्या खांब उभारणी सुरू होण्याची शक्‍यता 

निगडीपर्यंत मेट्रोची मागणी 
- पहिला टप्पा पिंपरी महापालिका भवनापर्यंत 
- महापालिकेतर्फे पिंपरी ते निगडी सविस्तर प्रकल्प आराखड्यासाठी (डीपीआर) निधी 
- महामेट्रो करणार डीपीआर 
- दहा महिन्यांत डीपीआर झाल्यानंतर राज्य व केंद्राच्या मंजुरीसाठी सादर 
- एका किलोमीटरसाठी लागणार 120 ते 140 कोटी रुपये 
- निगडीपर्यंतच्या सहा किलोमीटरसाठी 720 ते 840 कोटी रुपयांची आवश्‍यकता 

आकडे बोलतात... 
एकूण खांब 412 
खांबांचे फाउंडेशन 75 
खांब उभारणी 32 
पीअरकॅपसह खांब 10 
तयार सेगमेंट 102 
बसविलेले सेगमेंट 10 

Web Title: pimpri news metro PCMC