विज्ञान केंद्रात मिग २३ विमान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पिंपरी - बहुप्रतीक्षित असे भारतीय हवाई दलातील ‘मिग २३’ हे लढाऊ विमान पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्रात शनिवारी (ता. २५) दाखल झाले. त्याच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यानंतर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या विमानामुळे पिंपरी- चिंचवड शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

‘‘विमान उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांसाठी खुले करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र, लवकरात लवकर खुले करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न असेल,’’ अशी माहिती पिंपरी- चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता तसेच विज्ञान केंद्राचे समन्वयक प्रवीण तुपे यांनी ‘सकाळ’ला दिली. ‘‘पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या तारांगण प्रकल्पालगत दर्शनी भागात विमान उभारण्यात येत आहे. त्यामुळे विज्ञान केंद्र तसेच तारांगणला भेट देणाऱ्यांना ते जवळून पाहता येईल,’’ असेही तुपे यांनी सांगितले.

Web Title: pimpri news MiG-23