मुळा नदीवरील नियोजित पुलामुळे बोपखेलकरांची सोय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

पिंपरी - मुळा नदीपात्रावर बोपखेल-खडकीला जोडणारा पूल उभारल्यास सुमारे 12 ते 15 हजार बोपखेलवासीयांची सोय होणार आहे. त्यांना पुण्याला जाण्यासाठी सुमारे 18 किलोमीटरचा वळसा घालावा लागणार नाही. संबंधित पुलासाठी आवश्‍यक जागेचा ताबा आणि संरक्षण मंत्रालयाकडे महापालिकेने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील दोन वर्षात प्रत्यक्ष पुलाची उभारणी होऊ शकेल. 

लष्कराकडून जागेचा ताबा मिळत नसल्याने पूल कागदावरच राहिला होता. या पुलासाठी आवश्‍यक जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्याची प्रशासकीय कार्यवाही लष्कराने सुरू केली आहे. त्याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांना पत्राद्वारे कळविले आहे. 

पुलाअभावी अडचणी 
* पुण्याला जाण्यासाठी 18 ते 20 किलोमीटरचा वळसा 
* पुण्याला जाण्यासाठी दिघी-भोसरी, विश्रांतवाडी असे दोन मार्ग 
* शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, कामगार अशा सर्वांचीच गैरसोय 

पूल उभारल्यास फायदे 
* बोपखेल-खडकी अंतर फक्त तीन किलोमीटर होईल 
* पुणे, दापोडी (पिंपरी-चिंचवड) जाणे सोईस्कर होईल 
* विद्यार्थी, कामगारांची अधिक सोय 

बोपखेल रस्ता आणि उड्डाणपूल घटनाक्रम 
* 13 मे 2015 : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारातील (सीएमई) रस्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लष्कराकडून बंद 
* 21 मे 2015 : नागरिकांचे तीव्र आंदोलन; पोलिसांच्या लाठीमारात अनेक जखमी, संतप्त जमावाच्या दगडफेकीत पोलिसाचा मृत्यू 
* 28 मे 2015 : तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा बोपखेल-खडकी दरम्यान मुळा नदीवर तरंगता पूल उभारण्याचा आदेश 
* 25 ऑगस्ट 2015 : बोपखेलवासीयांच्या सोयीसाठी लष्कराने उभारला मुळा नदीपात्रावर तरंगता पूल 
* 7 जून 2016 : पावसाळ्यात पुलाला असलेला धोका लक्षात घेऊन काढला तरंगता पूल 
* सद्य:स्थिती : तरंगता पूल काढल्यानंतर आणि कायमस्वरूपी पुलाची कार्यवाही प्रलंबित असल्याने दररोज सुमारे सहा हजार नागरिकांची गैरसोय 

दोन वर्षात पूल उभारणे शक्‍य 
महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल-खडकी दरम्यान, उड्डाण पुलाबाबतचा प्रस्ताव लष्कराच्या बोर्ड ऑफ ऑफिसरसमोर मांडला होता. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अंतिम प्रस्ताव तयार केला. त्याला संरक्षण मंत्रालयाची परवानगी प्रलंबित आहे. त्यांच्याकडून परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाल्यानंतर पूल उभारण्यासाठी निविदा कार्यवाही होईल. पुलासाठी आवश्‍यक जागेचा ताबा मिळाल्यानंतर पुढील दोन वर्षांत पूल उभारणे शक्‍य आहे. या पुलासाठी सुमारे 40 ते 42 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांनी "सकाळ'ला दिली.

Web Title: pimpri news mula river bopkhel