पिंपरी- डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 

संदीप घिसे 
शुक्रवार, 23 मार्च 2018

पिंपरी : भरधाव वेगातील डंपरने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुण ठार झाला. ही घटना आकुर्डी येथे शुक्रवारी (ता.२३) सकाळी घडली. 

पिंपरी : भरधाव वेगातील डंपरने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुण ठार झाला. ही घटना आकुर्डी येथे शुक्रवारी (ता.२३) सकाळी घडली. 

अनिकेत आण्णासाहेब जकाते (वय १८, रा. चिंचवड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत हा आपल्या मित्रासोबत दूध टाकण्यासाठी दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या कचऱ्याचा डंपर (एमएच०२-एवाय-९१०९) अनिकेत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जकाते हे गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत अधिक तपास निगडी पोलिस करीत आहेत.

Web Title: pimpri news one dead in accident