स्थायी समितीचा तिढा सुटला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

पिंपरी - स्थायी समितीतून निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागेवर भाजपचे राहुल जाधव, विलास मडिगेरी, शीतल शिंदे, सागर आंगोळकर, नम्रता लोंढे व ममता गायकवाड यांची तर, राष्ट्रवादी काँग्रेसमधून गीता मंचरकर आणि प्रज्ञा खानोलकर यांची आज महापालिका सर्वसाधारण सभेत नियुक्ती करण्यात आली.

स्थायी समिती १६ सदस्यांची असते. महापालिकेतील पक्षीय बलानुसार समितीमध्ये सदस्यांची निवड होते. त्यानुसार ११ भाजपचे, चार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक शिवसेना असे सोळा सदस्यांचे बलाबल आहे. नियमानुसार पहिल्या वर्षी निम्मे म्हणजे आठ

सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची नियुक्ती केली जाते. पंधरा दिवसांपूर्वी चिठ्ठीद्वारे आठ सदस्य निवृत्त झाले. त्यात भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीचे दोघे बाहेर पडले. रिक्त जागांसाठी भाजपमधून सहा जागांसाठी २२, तर राष्ट्रवादीत दोन जागांसाठी पंधरा सदस्यांनी पक्षाकडे मागणी केली होती. भाजपमधून आपल्यालाच संधी मिळावी म्हणून इच्छुक सदस्यांनी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्याकडे लकडा लावला होता. काही सदस्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही वशिला लावण्याचा प्रयत्न केला. समिती सदस्यांची नावे निश्‍चित होत नसल्याने गेल्या आठवड्यातील सर्वसाधारण सभा तहकूब ठेवण्याची नामुष्की भाजपवर ओढवली होती. अखेर जुन्या आणि नव्या सदस्यांचा मेळ घालून या नावांची यादी ठरविण्यात आली. सत्ताधारी नेते एकनाथ पवार यांनी आज महापौर नितीन काळजे यांच्याकडे ही नावे बंद पाकिटातून सुपूर्द केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नावांबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर गटनेते योगेश बहल यांनी ती नावे महापौर काळजे यांच्याकडे दिली. त्यानंतर नियुक्तीची घोषणा झाली.  

समतोल साधण्यासाठी भाजपने भोसरी विधानसभा मतदारसंघातील राहुल जाधव, विलास मडिगेरी, नम्रता लोंढे, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सागर आंगोळकर आणि ममता गायकवाड तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शीतल शिंदे यांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने गीता मंचरकर आणि प्रज्ञा खानोलकर या दोन महिलांना संधी दिली. समिती अध्यक्षपदासाठी येत्या शनिवारी (३ मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून पहिल्या सभेत (७ मार्च) निवडणूक आहे. भाजपचे बहुमत असल्याने अध्यक्षही त्यांचाच होणार हे नक्की आहे.

जाधव, शिंदे की मडिगेरी
स्थायी समिती अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करायची यावरून भाजपमध्ये नव्या जुन्यांमध्ये शीतयुद्ध रंगले आहे. सुरवातीला आमदार जगताप यांच्या समर्थक सीमा सावळे यांना संधी मिळाल्याने आता आमदार लांडगे यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून राहुल जाधव यांच्या नावावर नवीन सदस्य आग्रही आहेत. दुसरीकडे जुन्यापैकी मडिगेरी यांचे नाव काही निष्ठावंतांनी पुढे रेटले आहे. या पदासाठी दुसरे निष्ठावंत शीतल शिंदे यांनी थेट संघातील ज्येष्ठांना साकडे घातल्याचे समजते.

Web Title: pimpri news PCMC standing committee