खासगी संस्था करणार आयटी परिसर चकाचक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कचा परिसर कायम चकाचक राहावा, यासाठी हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने वाकड पूल ते विप्रो फेज दोन पर्यंतच्या रस्त्याची दररोज खासगी संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत या उपक्रमाला सुरवात होणार आहे, असे संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

फेज दोनपर्यंतचा हा रस्ता पाच किलोमीटरचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूला दररोज मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असतो. विदेशी कंपन्यांचे अधिकारी आयटी पार्कमध्ये येत असतात. या अस्वच्छतेबाबत ते नाराजी व्यक्‍त करतात. 

शनिवार आणि रविवार या दिवशी आयटी कंपन्यांना सुटी असते. या कालावधीत येथील चौकामध्ये आठवडा बाजार भरतो. त्याचा कचरा मोठ्या प्रमाणात साठलेला असतो. वेळीच तो उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि त्याचा त्रास ये-जा करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे हा परिसर दररोज स्वच्छ ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. 

‘प्रायोगिक तत्त्वावर राबविणार’
हिंजवडी आयटी पार्कचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने वाकड पूल ते विप्रो फेज दोन दरम्यानचा रस्ता सकाळी आठ वाजण्यापूर्वी स्वच्छ करण्याचे ठरवले आहे. सुरवातीला सहा महिन्यांसाठी हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, रस्त्याची सफाई कर्मचाऱ्यांकडूनच करण्यात येईल. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येणार नाही. खेरीज स्वच्छता जागरूकता अभियानही घेण्यात येणार आहे. आयटी पार्कमधील रस्त्यावर जमा होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येसंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास त्याची व्याप्ती वाढविण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल यांनी सांगितले. 

Web Title: pimpri news private organisation it area cleaning