एम्पायर इस्टेट पूल पूर्णत्वाकडे

ज्ञानेश्‍वर बिजले
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पिंपरी - एम्पायर इस्टेटसमोरून जाणाऱ्या पुलाचे काम मार्चमध्ये पूर्ण होण्याची शक्‍यता असून या मार्गावरील बीआरटीची कामे जूनपर्यंत संपविण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. पवना नदी, लोहमार्ग आणि जुना पुणे-मुंबई रस्ता ओलांडत शहरातील नागरिकांना पूर्वेकडून पश्‍चिमेकडे या दीड किलोमीटर लांबीच्या पुलावरून जाता येईल. काळेवाडी फाट्यापासून हा रस्ता सुरू होत असून त्यानंतर पुलावरून ऑटो क्‍लस्टरपर्यंत तसेच पुढे केएसबी चौक, चिखलीगावापर्यंत जाता येईल. सुमारे दहा किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरून वाहनांना आणि बीआरटीला स्वतंत्र मार्ग असेल.

हायब्रीड बीआरटी
बीआरटीसाठी स्वतंत्र डेडिकेटेड मार्ग आहे. रस्त्याची रुंदी ४५ मीटर आहे. रुंदी जाधववाडी येथे ३० मीटर, कुदळवाडी येथे २४ मीटर आहे. त्यामुळे त्या दीड किलोमीटरच्या टप्प्यात हायब्रीड पद्धतीची बीआरटी असेल. त्या रस्त्यावर बीआरटी गाड्यांसोबत अन्य वाहनेही धावतील.

लवकरच वाहतूक सुरू
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता तसेच पूल येथील वाहतूक लवकरच सुरू होईल. ती सुरू होत असतानाच बीआरटीची कामे वेगाने सुरू होतील. सार्वजनिक बससेवा सुरू झाल्यावर शहरात खऱ्या अर्थाने बीआरटी सेवा सुरू होईल. 

कामाचे टप्पे
काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता या कामाचा आदेश २४ ऑगस्ट २००९ मध्ये दिला.
भूसंपादनातील अडथळे, अतिक्रमण यामुळे कामाला विलंब होत गेला. 
अद्यापही काही जागा ताब्यात आल्या नाहीत. 
काळेवाडी फाटा ते एमएम विद्यालयादरम्यानचा रस्ता पूर्ण होऊन वापर सुरू झाला. 
विद्यालयापासून पवना नदीपर्यंतच्या काम वेगाने सुरू आहे. तेथील बहुतांश जागा ताब्यात आहेत.
९८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम ९२ टक्के पूर्ण झाले.
नदीच्या बाजूला पूल आणि नवीन रस्ता यांच्यातील रॅम्प बनविण्याचे काम सुरू आहे. 
निगडी-दापोडी रस्त्यावर जाण्यासाठी एम्पायर इस्टेट सोसायटीजवळ रॅम्प बांधण्यासाठी निविदा मंजूर.
ऑटो क्‍लस्टर ते केएसबी चौकदरम्यान रस्त्याचे काम पूर्ण. एमआयडीसीतील एका जागेचा ताबा नाही.
केएसबी चौक ते चिखली गावादरम्यानचा रस्ताही झाला आहे.

पुलाचे फायदे
काळेवाडी भागातून चिंचवड औद्योगिक वसाहतीत लोकांना थेट जाता येईल
पिंपरी, चिंचवड गावांतील अंतर्गत वाहतुकीवर ताण कमी होईल
वाकड, पिंपळे निलख, काळेवाडी, हिंजवडी, ताथवडे, किवळे, रावेत येथील प्रवाशांना उपयुक्त
कुदळवाडी, मोशी, भोसरी, देहू, आळंदी, संभाजीनगर, शाहूनगर, चिखली भागातील प्रवाशांना पूर्वेकडे जाण्यास उपयुक्त

Web Title: pimpri news pune news empire estate bridge