दोन दिवस एका स्वप्नाचे, तुमच्या स्वत:च्या घराचे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पिंपरी - रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ शनिवार (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होत आहे. या एक्‍स्पोमध्ये ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १२५ हून अधिक प्रकल्पांची माहिती उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया...

पिंपरी - रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून देणारा ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ शनिवार (ता. १०) आणि रविवारी (ता. ११) चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होत आहे. या एक्‍स्पोमध्ये ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १२५ हून अधिक प्रकल्पांची माहिती उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया...

वन बीएचकेमध्ये सवलत
महारेरा कायद्यामुळे लोकांच्या मनातील भीती कमी होऊन लोकांत जागृती निर्माण झाली आहे. जागेत गुंतवणूक करणारे बाहेर पडले आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही वन बीएचके सदनिकेच्या जीएसटीमध्ये सवलत देणार आहेत. एकाच छताखाली या प्रदर्शनामुळे ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यात थेट संवाद होतो. तसेच ग्राहक फसवणुकीला बळी पडत नाहीत.
- जितेंद्र सोनिगरा, संचालक, श्री सोनिगरा डेव्हलपर्स

ग्राहकांना फायदा
‘महारेरा’, ‘जीएसटी’चे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. ‘महारेरा’ कायद्यामुळे ग्राहकांमध्ये नवीन विश्‍वास निर्माण झाला आहे. त्यामुळे, बांधकाम क्षेत्रावरील मरगळ काही अंशी निघून जाईल. जीएसटी’मधील कपातीचा ग्राहकांना फायदा होईल. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे बांधकाम क्षेत्रावर सकारात्मक परिणाम दिसतील. ‘सकाळ’च्या प्रदर्शनामुळे व्यावसायिकांना मोजावी लागणारी मार्केटिंगची किंमत कमी होते. तसेच ग्राहकांनाही तुलनात्मक अभ्यास करून निर्णय घेणे शक्‍य होते.
- नितीन कुलकर्णी, संचालक, लिटिल अर्थ-मासुळकर सिटी

साइट व्हिजिटची सोय
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मर्यादा वाढविल्याने घरांच्या बुकिंगमध्ये फरक दिसून येत आहे. व्याजदर व जीएसटीमुळे घरांच्या अप्रत्यक्ष किमती खाली आल्या आहेत. या प्रदर्शनात आम्ही ग्राहकांसाठी साइट व्हिजिटचीही सोय केली आहे.
- राहुल सांकला, संचालक, रोशन रिॲलिटी

नोंदणी करणाऱ्यास गाडी भेट
बांधकाम क्षेत्राला यंदा उभारी मिळू लागली आहे. घरे घेण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. ‘सकाळ’ प्रदर्शनात नेहमी गरजू आणि दर्जेदार ग्राहक भेट देतात. प्रदर्शनाच्या निमित्ताने जागेवर नोंदणी केल्यास ग्राहकांना ‘व्हेस्पा’ गाडी विनामूल्य देणार आहोत.
- दिनेश जहागीरदार, संचालक, मंत्रा वास्तू प्रा. लि.

घर घेण्याची चांगली वेळ
ग्राहकांना घर घेण्याची ही चांगली वेळ आहे. ‘महारेरा’, ‘जीएसटी’मुळे घरांच्या किमती १५ ते २० टक्‍क्‍यांपर्यंत अप्रत्यक्षरीत्या खाली आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे ग्राहकांना जवळपास अडीच लाख रुपयांच्या अनुदानाचा फायदा होत आहे. व्याजदरही कमी असल्याने सुलभ गृहकर्ज उपलब्ध आहे. बॅंकांकडूनही चांगल्या ऑफर देण्यात आल्या आहेत.
- दीपक शहा, संचालक, तत्वम कन्स्ट्रक्‍शन प्रा. लि.

बजेट फ्लॅटला मागणी
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बांधकाम क्षेत्रात सुधारणा होऊन त्याची ३० ते ४० टक्के इतकी वाढ झाली आहे. बजेट फ्लॅटला अधिक मागणी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे ग्राहकांना कर्जात सवलत मिळत आहे. स्वतःच्या पसंतीचे घर घेण्यासाठी ग्राहकाला ठिकठिकाणी फिरावे लागते. परंतु, ‘सकाळ वास्तू’ मुळे ग्राहकांना इतरत्र जावे लागणार नाही.
- पंकज बोरा, सोनिगरा होम्स, प्रमुख मार्केटिंग ॲण्ड सेल्स

Web Title: pimpri news pune news sakal vastu expo