संत तुकारामांच्या गाथेची हिंदी आवृत्ती राष्ट्रपतींना भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

पिंपरी - खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बुधवारी (ता. २८) भेट घेऊन त्यांना संत तुकाराम महाराजांच्या गाथेची हिंदी आवृत्ती भेट म्हणून दिली. बारणे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही गाथा भेट दिली होती.

बारणे म्हणाले, ‘‘जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांचे मंदिर हे मावळ मतदार संघात देहू येथे आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग सुपरिचित असून, देशातील मान्यवरांपर्यंत गाथा पोचावी, या हेतूने मान्यवरांच्या भेटीदरम्यान मी गाथा भेट देत आहे. देहू संस्थानच्या वतीने गाथेचे हिंदीत भाषांतर केले असल्याने हिंदी भाषकांना तुकाराम महाराजांचे विचार सहज समजतील.’’

Web Title: pimpri news sant tukaram maharaj gatha hindi book president gift