मेट्रोमुळे सेवारस्त्याची कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पिंपरी -पिंपरी ते दापोडीदरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे या मार्गावरील सेवारस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला असून, ते पूर्ण होईपर्यंत सेवा रस्त्यावर पूर्णतः नो पार्किंग लागू करण्याबाबत वाहतूक पोलिस विचार करत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या पाहणी करून त्या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 

पिंपरी -पिंपरी ते दापोडीदरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे या मार्गावरील सेवारस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला असून, ते पूर्ण होईपर्यंत सेवा रस्त्यावर पूर्णतः नो पार्किंग लागू करण्याबाबत वाहतूक पोलिस विचार करत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये या पाहणी करून त्या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 

दापोडीजवळील सीएमइच्या चौकामध्ये सबवे आणि मेट्रो ही दोन्ही कामे सुरू आहेत. पिंपरीकडे जाणाऱ्या सेवारस्त्याच्या बाजूला वाहने उभी असतात. ग्रेडसेपरेटरमध्ये मेट्रोचे खांब उभे करण्याचे काम सुरू असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. सेवा रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. असे असताना दुचाकी, मोटारी उभ्या असतात. फुगेवाडी चौकात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सातत्याने जाणवत असतो. सेवा रस्त्यावर असणारा बसथांबा आणि उभी केलेली वाहने त्यामुळे इथल्या कोंडीत भर पडते. नाशिक फाट्याच्या चौकात खासगी लक्‍झरी बस थांबलेल्या असतात.

पालिकेसमोर समस्या
पालिकेसमोरील वाहतुकीची समस्या आहे. सेवारस्त्यावरच  ये-जा करणाऱ्यांची वाहने उभी असतात. मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर  समस्या गंभीर होईल, असे मत नागरिक व्यक्‍त करत आहेत. 

पुणे-मुंबई रस्त्यावरील दापोडी ते पिंपरीदरम्यानच्या सेवारस्त्यावर नो पार्किंग करण्याचा विचार आहे. वाहतूक पोलिसांकडून या रस्त्याची पाहणी करण्यात येईल. येथील समस्यांचा अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. 
- अशोक मोराळे, उपायुक्‍त, वाहतूक पोलिस, पुणे शहर

वाहतुकीचे योग्य नियोजन हवे
वाहतूक कोंडीबाबत व्यावसायिक थॉमस जॉन म्हणाले,  ‘‘मेट्रोच्या कामामुळे ग्रेडसेपरेटरचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाला आहे. पोलिसांनी योग्य नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे.’’ तर स्थानिक नागरिक विनायक कोष्टी म्हणाले, ‘‘मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत योग्य नियोजन आवश्‍यक असून, कायमस्वरूपी देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेची नेमणूक करण्याची गरज आहे.’’ 

Web Title: pimpri news Service road traffic jam due to Metro