वृद्ध पित्याची पुत्रासाठी धडपड

रवींद्र जगधने
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पिंपरी - तीन वर्षांपूर्वी मित्राच्या दुचाकीवरून कामाला जाणाऱ्या तरुणाला रिक्षाने धडक दिली. त्यात त्याच्या गुडघ्याला मुक्का मार लागला. त्या वेळी किरकोळ उपचार केल्यानंतर बरे वाटले. आता तेच दुखणे पुन्हा सुरू होऊन गुडघ्याचा सांधाच निकामी झाला आहे. त्याच्या शस्त्रक्रियेसाठी साडेचार लाख रुपयांची गरज असून, त्यासाठी प्रसादच्या ७५ वर्षीय वडिलांची धडपड सुरू आहे. 

प्रसाद बलवंत मसूरकर (वय ३८, रा. महादेवकृपा, बिल्डिंग, कवडेनगर, पिंपळे गुरव) असे तरुणाचे नाव. तो मूळचा जामसंडे (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) गावचा. आयटीआय शिक्षण झालेला प्रसाद नोकरीसाठी पाच वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडला आला. एका कंपनीत नोकरी मिळाली. कुटुंबीयांना आनंद झाला. मात्र, २०१४ मध्ये मित्राच्या दुचाकीवरून जाताना रिक्षाची धडक बसली. मित्रासह प्रसादही जखमी झाला. रिक्षावाला पळून गेला. प्रसादच्या डाव्या गुडघ्याला मार बसला होता. खासगी दवाखान्यात उपचार घेतले. गुडघा दुखणे बंद झाले. काही दिवसांनी लग्नही झाले. प्रसाद पत्नीसह सांगवीत राहू लागला. नोकरीही व्यवस्थित सुरू होती. मात्र, सहा महिन्यांपासून गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. वायसीएम रुग्णालयात तपासणी केली. गुडघ्यात पाणी झाल्याचे निदर्शनास आले. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया केली. गुडघ्यातील पाणी काढले. पावणेदोन महिने पायाला प्लास्टर होते. ते काढल्यानंतर मात्र पाय सरळ करण्यास त्रास होऊ लागला. वायसीएम रुग्णालयात चुकीचे उपचार झाल्याचा समज झाला. त्यामुळे पुन्हा वायसीएममध्ये न जाता पायावर आयुर्वेदिक उपचार सुरू केले, असे प्रसादचे वडील बलवंत मसूरकर यांनी सांगितले. 

मात्र, गेल्या २८ ऑक्‍टोबरला गुडघा व मांडीतून दूषित पाणी व रक्त बाहेर येऊ लागल्याने प्रसादने पिंपळे गुरव येथील दवाखाना गाठला. डॉक्‍टरांनी निगडीतील खासगी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. तिथे उपचार केले. डावा गुडघा निकामी झाल्याचे कळले. सांधा बदलण्यासाठी चार लाख ५९ हजार रुपयांचा खर्च रुग्णालय प्रशासनाने सांगितला. मात्र, एवढी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्‍न प्रसादसमोर आहे. त्याच्या ७५ वर्षीय वडिलांची मात्र रक्कम उभी करण्यासाठी धडपड सुरू असून, त्यांनी प्रसादची व्यथा ‘सकाळ’शी बोलताना मांडली.

Web Title: pimpri news The struggle for the son of the aged father