थेरगावात स्वाइन फ्लूने ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पिंपरी - स्वाइन फ्लूने बुधवारी (ता.२६) थेरगाव येथील खासगी रुग्णालयात चारवर्षीय मुलीचा मृत्यू झाला. चालू वर्षात गेल्या सात महिन्यांमध्ये स्वाइन फ्लूने एकूण २६ जणांचा बळी घेतला आहे.

संबंधित मुलगी मूळची इंदोरी (मावळ) येथील आहे. तिला २५ तारखेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी तिच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले. तपासणीअंती तिला स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. 

Web Title: pimpri news swine flu