पिंपरी - पाणीपुरवठ्यासाठी चार निविदा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पिंपरी - शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी "अमृत' योजनेतून 244 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. याबाबत तीन वेळा निविदा काढूनही फक्‍त एकच ठेकेदार यामध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे सरकारची मंजुरी घेऊन आता विभागानुसार चार निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिली. 

शहराच्या 40 टक्‍के भागाला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी जेएनएनयूआरएम योजनेतून मंजुरी मिळाली असून, त्याबाबतचे कामही सुरू झाले आहे. उर्वरित 60 टक्‍के भागाला पुरेशा दाबाने 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी "अमृत' योजनेतून मंजुरी मिळाली. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने 244 कोटी रुपयांची निविदा काढली. या निविदा प्रक्रियेमध्ये केवळ एकच ठेकेदार सहभागी होत होता. त्या ठेकेदारानेही 19 टक्‍के जादा दराने निविदा भरली होती. 

चोवीस तास पाणीपुरवठ्याकरिता काढलेली 244 कोटींची निविदा रक्‍कम जादा असल्याने अनेक छोटे ठेकेदार या निविदा स्पर्धेत सहभागी होत नव्हते. यामुळे महापालिकेने या कामासाठी चार वेगवेगळ्या निविदा काढण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती. सरकारने त्यास मंजुरी दिल्यानंतर आता सुमारे 50 ते 60 कोटींच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

जलवाहिन्या बदलणे गरजेचे 
शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना अनेक अडचणी येतात. शहरातील नळजोडांना मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र नॉन रेव्हेन्यू पाण्याचे प्रमाण अधिक आहे. याचे प्रमुख कारण पाणीगळती हे आहे. गळती कमी केल्यास सध्या उपलब्ध असलेले पाणी शहराला पुरेल. गळती रोखण्यासाठी जलवाहिन्या बदलणे आवश्‍यक आहे.

Web Title: pimpri news water pcmc

टॅग्स