55 अनधिकृत क्रॅशगार्ड व बुलबार्स लावलेल्या वाहनांवर सांगवीत कारवाई

रवींद्र जगधने 
रविवार, 14 जानेवारी 2018

पिंपरी - केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार अनधिकृतपणे वाहनांना क्रॅशगार्ड व बुलबार्स लावणाऱ्या 55 वाहनांवर सांगवी वाहतूक विभागाने धडक कारवाई करत 30 हजारांचा दंड वसूल केला. तर त्यापैकी 17 वाहनांवर कडक कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव आरटीओकडे पाठवले आहेत. 

पिंपरी - केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार अनधिकृतपणे वाहनांना क्रॅशगार्ड व बुलबार्स लावणाऱ्या 55 वाहनांवर सांगवी वाहतूक विभागाने धडक कारवाई करत 30 हजारांचा दंड वसूल केला. तर त्यापैकी 17 वाहनांवर कडक कारवाई करण्याबाबतचे प्रस्ताव आरटीओकडे पाठवले आहेत. 

मोटार वाहन कायदा 1988 कलम 52 नुसार वाहनांना अनधिकृतपणे क्रॅशगार्ड व बुलबार्स बसवणे बंदी असताना अनेक वाहनचालक या नियमाचे उल्लंघन करतात. त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने सर्व राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालये व वाहतूक विभाग यांना याबाबत कारवाई आदेश दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सांगवी वाहतूक विभागाने एकूण 55 वाहनांवर कारवाई केली. त्यापैकी 17 वाहनांवर कारवाईबाबतचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवले असल्याचे वाहतूक पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी 'सकाळ' ला सांगितले. 

विक्री करणाऱ्यांवर कारवाई का नाही
अनेक वाहनचालकांना या कायद्याबाबत माहिती नाही. मात्र, याची व्यवसायिक खुलेआम विक्री व वाहनांना बसवून देतात. त्यांच्यावर कारवाई का? होत नाही. तसेच काळी काच, कर्कश हॉर्न, बुलेटच्या सायलेंसरमध्ये बदल, फॅन्सी नंबर प्लेट याबाबत वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाते. परूंतू, या सर्वांची बाजारात राजरोसपणे विक्री करणाऱ्यांवर पोलिस व संबंधित विभाग कारवाई करणार का? असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. 

कारवाई सुरूच राहणार
या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपयांचा दंड आहे. पुणे पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे व सहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई कायम सुरू ठेवली जाणार आहे. 
- किशोर म्हसवडे, पोलिस निरीक्षक, सांगवी वाहतूक विभाग.

Web Title: pimpri pune news crime on 55 vehicle