गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा स्वतंत्र आयुक्‍तालयाची

संदीप घिसे
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

पिंपरी - शहराची लोकसंख्या २२ लाखांवर आहे. शहरालगतच्या चाकण आणि तळेगावचाही विस्तार होत आहे. शहरात गुन्हे करून अनेक गुन्हेगार लगतच्या ग्रामीण भागात लपण्यासाठी पळून जातात. ग्रामीण भागातील गुन्हेगारीत वाढ आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाची गरज आहे. याबाबत सरकारच्या वित्त विभागाने मान्यता दिली असून, विधानसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी - शहराची लोकसंख्या २२ लाखांवर आहे. शहरालगतच्या चाकण आणि तळेगावचाही विस्तार होत आहे. शहरात गुन्हे करून अनेक गुन्हेगार लगतच्या ग्रामीण भागात लपण्यासाठी पळून जातात. ग्रामीण भागातील गुन्हेगारीत वाढ आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाची गरज आहे. याबाबत सरकारच्या वित्त विभागाने मान्यता दिली असून, विधानसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

उपायुक्तांच्या कक्षा
पिंपरी-चिंचवड शहरात सांगवी, वाकड, चिंचवड, भोसरी, पिंपरी, निगडी, एमआयडीसी, दिघी आदी पोलिस ठाणी आहेत. महापालिका हद्दीबाहेरील हिंजवडी पोलिस ठाण्याचा आणि ग्रामीण देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग शहर पोलिस दलात येतो. 

वस्तुस्थिती
ग्रामीण आणि शहर हद्दींचा फायदा घेत अनेक सराईत गुन्हेगार शहरात गुन्हे करून ग्रामीण भागात लपण्यासाठी जातात. कुदळवाडी, चिखली भाग ग्रामीण अर्थात देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असताना पोलिस कमी असल्याने गुन्हेगारांचे आश्रयस्थान होते. कुख्यात दहशतवादी भटकळ बंधू वास्तव्य करून गेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आता हा भाग शहर पोलिसांना जोडल्यामुळे गुन्हेगारी कारवाया थंडावल्या आहेत. 

देहूरोड आयुक्तालयात का?
देहूरोड परिसरात महाकाली आणि रावण टोळी कार्यरत आहे. या दोन्ही टोळ्यांची ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील रावेत आणि आकुर्डीदरम्यानच्या पट्ट्यामध्ये दहशत आहे. ती मोडून काढण्यासाठी हा भाग आयुक्तालयाशी जोडणे सयुक्तिक ठरेल. 

आमदारांचे प्रयत्न...
आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि ॲड. गौतम चाबुकस्वार हे शहरात आयुक्‍तालय होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वेळोवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. विधिमंडळात तारांकित प्रश्‍न आणि लक्षवेधी मांडलेल्या आहेत. 

हवी फक्त मुख्यमंत्र्यांची सही
स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाची फाइल गृह विभागाकडून वित्त विभागाकडे आणि वित्त विभागाचा अनुकूल शेरा मिळून मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी आहे.

सद्यःस्थिती...
पुणे पोलिस आयुक्‍तालयात पिंपरी-चिंचवडचा समावेश
एक उपायुक्‍त आणि एक सहायक आयुक्त कार्यालय शहरात
सायबर क्राइम, महिला कक्ष, वाहतूक उपायुक्‍त, समाजसेवा शाखा, अमली पदार्थविरोधी पथक, खंडणीविरोधी पथक यांचे कामकाज पुण्यात
शहरातील नागरिकांना सुमारे २५ किलोमीटरचा प्रवास करून जावे लागते

पुण्यात आयुक्तालयाची गरज
गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय अत्यंत गरजेचे
विविध विभाग मिळून पोलिसांची संख्या वाढणार

आमदार म्हणतात...
महेश लांडगे - हिवाळी अधिवेशनात घोषणा होण्याची शक्‍यता आहे
ॲड. गौतम चाबुकस्वार - आगामी अधिवेशनात सरकारकडे पाठपुरावा करू

Web Title: pimpri pune news The Independent Commissioner waiting for criminal background