चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

वडगाव मावळ - कान्हे (ता. मावळ) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी व मुलाचा गळा चिरून खून केला. या हल्ल्यात मुलगी व अन्य एक जण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी पहाटे एक ते दोनच्या दरम्यान घडली. या कृत्यानंतर स्वतःहून हजर झालेल्या पतीला पोलिसांनी अटक केली. 

वसंत गोपाळ सातकर (वय ४२, रा. कान्हे) याला याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने पत्नी रजनी वसंत सातकर (वय ३८) व मुलगा अनुष वसंत सातकर (वय १३) यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. त्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी श्रावणी (वय ९ ) व गणेश आंबेकर हेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रजनीच्या भावाने याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनी हिचे आंबेकर याच्या बरोबर अनैतिक संबंध असल्याचा वसंतला संशय होता. या संशयावरून सोमवारी पहाटे त्याने घरातील तिघांवर व आंबेकर याच्यावर हल्ला केला व त्यानंतर स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवतरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक प्रदीप काळे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: pimpri pune news murder in vadgav maval