पीएफ कार्यालयाला हवी एचएची जमीन

सुधीर साबळे
सोमवार, 19 मार्च 2018

पिंपरी - भविष्यनिर्वाह निधी विभागाच्या (पीएफ) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यालयांच्या केंद्रीकरणाचा विचार पीएफ विभागाने सुरू केला आहे. त्यासाठी हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स (एचए) कंपनीकडे ३.४७ एकर जमिनीची मागणी केली आहे. ही जमीन उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी पीएफ विभागाला अत्याधुनिक कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करता येणार आहे.

सद्य:स्थिती
 पीएफ कार्यालये पुण्यात गोळीबार मैदान येथील कॅन्टोन्मेंट इमारत आणि आकुर्डीतील संजय काळे सभागृहात
 दोन्ही कार्यालये भाडेतत्त्वावरील इमारतीत
 पीएफचा स्वतंत्र कार्यालयासाठी प्रस्ताव

प्रस्ताव
 एचएची ३.४७ एकर जमिनीसाठी केंद्रीय रसायन मंत्रालयाकडे पीएफ विभागाचा प्रस्ताव
 एचएच्या जमिनीचा दर जास्त असल्याने अद्याप निर्णय नाही 
 गेल्या आठवड्यात केंद्रीय कामगार सचिवांशी चर्चा, केंद्रीय रसायन मंत्रालयाच्या सचिवांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन

एचएला फायदा
 एचएच्या ८७ एकर मोकळ्या जमिनीच्या लिलावास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता 
 गेल्यावर्षी लिलावप्रक्रिया राबविली, मात्र कुणीही स्वारस्य दाखवले नाही 
 सरकारी विभागांना जमीन दिल्यास कंपनीला फायदा : कामगारांचे पगार, कंपनी सुरू ठेवण्यासाठी भांडवल, थकीत देणी देता येणे शक्‍य

प्राप्तिकर विभागाकडूनही मागणी
 प्राप्तिकर विभागाकडूनही एचएकडे तीन एकर जमिनीची मागणी
 पुण्यात साधू वासवानी रोड, स्वारगेट, प्रभात रोड, सॅलिसबरी पार्क व पिंपरी-चिंचवडमध्ये आकुर्डीत प्राप्तिकर खात्याची कार्यालये आहेत. त्यांचे केंद्रीकरण शक्‍य

एचएकडे जमिनीची मागणी केली आहे. या संदर्भात केंद्रीय रसायन मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला असून, पाठपुरावा सुरू आहे. 
- अमिताभ प्रकाश, क्षेत्रीय आयुक्‍त, पीएफ कार्यालय

Web Title: pimpri pune news pf office ha land