मुलगी झाली, लक्ष्मी आली...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पिंपळे सौदागर येथील कोकणे मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम

पिंपरी - अलीकडे ‘बेटी बचाओ’चा नारा प्रत्येक जण लगावतो..पण,
त्यातील किती जण त्याला कृतीची जोड देतात.. कसलेही शुल्क न आकारता मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा डॉ. गणेश राख यांच्यासारखा एखादाच असतो. मात्र, ज्या घरी मुलगी जन्माला येईल, त्या कुटुंबाला पाच हजार रुपये देण्याचा उपक्रम पिंपळे सौदागर येथील कोकणे मित्र मंडळाने हाती घेऊन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. मंडळाचे अध्यक्ष उल्हास कोकणे यांनी तो मोठ्या नेटाने सुरू ठेवला असून, आतापर्यंत त्यांनी २० मुलींचे असे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे. 

मंडळाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत कोकणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू करण्यापासून रक्तदान शिबिर, मेळावे, व्याख्याने, वारकऱ्यांना खाऊवाटप, अन्नदान असे अनेक सामाजिक कामे केली आहेत. मंडळाच्या निर्भया महिला मंचच्या वतीनेही महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रम घेण्यात आले आहेत. त्यामध्ये रहाटणी परिसरातील महिला व मुलींना विनाशुल्क ब्यूटी पार्लर, संगणक, शिवणकाम आणि पाककलेचे प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत चार ते पाच हजार महिलांनी या प्रशिक्षण शिबिरांचा लाभ घेतला आहे. एवढेच नव्हे, रहाटणी प्रभागातील डास निर्मूलन करण्याच्या दृष्टीने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने फॉगिंग मशिन खरेदी केले आहे. मंडळाचे कार्यकर्ते आवश्‍यक त्या ठिकाणी धुरीकरण करून डास निर्मूलनासाठी प्रयत्न करतात. त्या व्यतिरिक्तही रहाटणी आणि पिंपळे सौदागर परिसरात मंडळाचे अध्यक्ष कोकणे यांच्या वतीने ई-रिक्षा सुरू करण्यात आली आहे. 

स्त्री भ्रूण हत्या हा आपल्याकडील मोठा गंभीर विषय आहे. भारतामध्ये मुलींचा जन्मदर अत्यंत कमी आहे. त्यामुळे नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नोव्हेंबर २०१६ मध्ये ‘मुलगी जन्माचे स्वागत’ हा उपक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत ज्या कुटुंबात मुलगी जन्माला आली, त्यांना पाच हजार रुपये रक्कम भेट म्हणून दिली गेली. आतापर्यंत वीसहून अधिक मुलींचे आम्ही अशा प्रकारे स्वागत केले.
- उल्हास कोकणे, मंडळाचे अध्यक्ष

Web Title: pimpri pune news pimpri ganesh utsav girl save