पोलिसांनी तंबाखूचे सेवन टाळावे - शिंदे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

पिंपरी - ‘‘देशात दरवर्षी आठ लाखांहून अधिक व्यक्‍तींचा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे मृत्यू होत आहे. पोलिस दलात धावपळ अधिक आहे. त्यामुळे पोलिस तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात, यातून पुढे अनेक आजाराची शक्‍यता असते. पोलिसांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’’ असे मत परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी येथे व्यक्‍त केले. 

इंडियन डेन्टल असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मौखिक आरोग्य तपासणी, पोलिस, शिक्षक, अंध व विशेष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, उत्कृष्ट कार्य केलेल्या दंत वैद्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन पोलिस उपायुक्‍त शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वायसीएम रुग्णालय दंत विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत इंगळे, आयडीए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. राकेश प्रसाद, डॉ. विकास बेंदगुडे, डॉ. मनीषा गरुड, डॉ. कौस्तुभ पाटील आदी उपस्थित होते. या वेळी ‘वुमन्स अवॉर्ड-२०१८’ चे वितरण करण्यात आले. बेस्ट महिला दंतरोगतज्ज्ञ डॉ. मंजूषा इंगळे यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या वेळी डॉ. माया दलाया, डॉ. माधवी म्हापुसकर, डॉ. सुप्रिया खेऊर, डॉ. विता काबरा, डॉ. दीपाली पाटेकर, डॉ. सुहासिनी घाणेकर, डॉ. मोना दिवाण, डॉ. मीनल सपाटे, डॉ. प्रतिभा भोसले, डॉ. श्रुती कुलकर्णी, डॉ. जुबी अब्राहम, डॉ. अनुजा कृष्णा, डॉ. सुजाता पिंगळे, डॉ. मनीषा सुकाळे, डॉ. मनीषा गरुड, डॉ. सपना अगरवाल, डॉ. मरियुम, डॉ. ख्याती गिडवानी, डॉ. सुज्ञा कुलकर्णी, डॉ. प्रांजल वाघ, डॉ. समज्ञा ढवळेश्वर, डॉ. ऐश्वर्या लोहकरे, डॉ. मीनाक्षी घोळकर, डॉ. संयुक्‍ता खैरनार-रॉय, डॉ. सोनिया रोहरा, डॉ. स्वप्ना निकाजू यांचा गौरव करण्यात आला डॉ. यशवंत इंगळे यांचे कर्करोगविषयी जनजागृती करणारे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा गांगुर्डे आणि डॉ. संयुक्‍ता खैरनार यांनी केले.

Web Title: pimpri pune news police tobacco care ganesh shinde