‘सबसे बडा रुपय्या’ने हसविले

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड - ‘सबसे बडा रुपय्या’ या नाटकातील कलाकारांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड - ‘सबसे बडा रुपय्या’ या नाटकातील कलाकारांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला.

पिंपरी - चंद्रावरच्या जागेसाठी पाच लाख रुपये... दारूड्या शेजाऱ्याकडे दारूची टाकी बसवायची आहे, तर मग पाच हजार रुपये.... यासारख्या निरनिराळ्या शक्कल वापरून सर्वांना हातोहात फसविणाऱ्या आणि सध्याच्या व्यवहारी जगात रुपयांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘सबसे बडा रुपय्या’ या कौटुंबिक विनोदी नाटकाला रसिक श्रोत्यांनी शनिवारी खळखळून हसत दाद दिली. 

‘सकाळ’च्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त चिंचवड येथे ‘सकाळ नाट्यमहोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त तिसरे पुष्प गुंफताना ‘श्री सिद्धिविनायक’ निर्मित ‘सबसे बडा रुपय्या’ हे नाटक सादर करण्यात आले. लेखक-दिग्दर्शक आणि मुख्य भूमिकेतील विजय पटवर्धन यांनी नाटकात धमाल उडवून दिली. आपण अनेकदा मित्रमंडळी, नातेवाईक किंवा शेजारपाजाऱ्यांकडून हातउसने पैसे घेत असतो आणि ते प्रामाणिकपणे परतही करतो. मात्र नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकाला खोटे मारत हातोहात फसविणारा अवलिया काही औरच. त्याचेच यथार्थ दर्शन ‘सबसे  बडा रुपय्या’ या नाटकातून रसिकांना झाले. तत्पूर्वी, ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयातील मुख्य व्यवस्थापक मिलिंद भुजबळ, विनायक बावडेकर यांनी सर्व कलाकारांचे रोप देऊन स्वागत केले. निर्माता व अभिनेते शेखर लोहोकरे, मेघा पाटील, गणेश इनामदार, राजीव बावडेकर, गौतमी कलबाग, विनोद खेडकर आणि सुनील गोडबोले यांनी नाटकात विविध पात्रांच्या भूमिका वठविल्या. ज्येष्ठ कलाकार सुनील गोडबोले यांनी नेहमीच्या शैलीत चांगली भूमिका केली आहे. संदीप शितोळे (नेपथ्य), प्रशांत कुलकर्णी (संगीत), गीते (संजय डोळे) यांनी तांत्रिक बाजू संभाळल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com