खासदार श्रीरंग बारणे यांना सलग तिसऱ्यांदा ‘संसदरत्न’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

पिंपरी - लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्‍न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थिती; तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल श्रीरंग बारणे यांची चेन्नई येथील पंतप्रधान पॉइंट फाउंडेशनच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

प्रथमच निवडून गेलेल्या खासदारांमध्ये खासदार बारणे यांना लोकसभेमध्ये केलेल्या कामकाजाबद्दल शनिवारी (ता. २७) आयआयटी मद्रास (चेन्नई) येथे होणाऱ्या कार्यक्रमात ‘संसदरत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. 
खासदारांची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थिती यासंदर्भात पी. आर. एस. इंडियाने दिलेल्या आकडेवारीवरून कामगिरीची आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरून याचे मूल्यांकन निवड समितीमार्फत करण्यात येते, त्यानुसार चेन्नई येथील  पंतप्रधान पॉइंट फाउंडेशनच्या वतीने ‘संसदरत्न’ हा पुरस्कार दिला जातो. सोळाव्या लोकसभेच्या गेल्या तीन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेचे मावळ लोकसभेचे खासदार बारणे यांनी ७६२ प्रश्‍न उपस्थित केले. २२२ वेळा प्रत्यक्ष चर्चेत सहभाग घेतला, ९२ टक्के उपस्थिती दर्शविली. १२ खासगी विधेयके मांडली. त्याचबरोबर विविध समितींच्या बैठकीमध्ये सर्वाधिक उपस्थिती आणि स्थानिक खासदार विकास निधीचा सर्वाधिक वापर करून विविध विकासकामे पूर्णत्वास आणली.

Web Title: pimpri pune news sansadratna to shrirang barane