पोलिसांनी तक्रार न घेतल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

रवींद्र जगधने
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

पिंपरी - पोलिसांनी तक्रार न घेतल्याने महिलेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (ता. 18) रात्री आठच्या सुमारास देहूरोडमधील विकास नगरमध्ये घडली. 

पिंपरी - पोलिसांनी तक्रार न घेतल्याने महिलेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (ता. 18) रात्री आठच्या सुमारास देहूरोडमधील विकास नगरमध्ये घडली. 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, महिला राहत असलेल्या सोसायटीतील एका व्यक्तीने घटनेच्या रात्री सातच्या सुमारास जुन्या भांडणाच्या रागातून एका 28 वर्षीय महिलेला शिवीगाळ केली. याबाबत महिलेने देहूरोड पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी तिची तक्रार घेण्यास नकार दिला. तक्रार घेत नसल्याने महिलेने आपल्या मोबाईलमध्ये व्हीडीओ चित्रीकरण सुरू करून तक्रार न घेण्याचे कारण विचारले असता, पोलिसांनी मोबाईल हिसकावून मोबाईल पूर्णपणे फॉरमॅट मारला. या प्रकारामुळे नैराश्‍यात गेलेल्या महिलेने घरी येऊन झोपेच्या दहा गोळ्या सेवन केल्या. महिलेला जास्तच त्रास होऊ लागल्याने तिला देहूरोडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. पोलिस ठाण्यात घडलेला हा सर्व प्रकार पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असल्याचा दावा महिलेने केला आहे. याबाबत देहूरोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अरूण मोरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस प्रभारी पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते म्हणाल्या, हा गंभीर प्रकार असल्याने या प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: pimpri pune news woman attempted suicide due to not complate by the police