पिंपरी सांडस येथील कचरा डेपो विरोधात ग्रामस्थ एकवटले

शरद पाबळे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

कोरेगाव भीमा (पुणे): पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील कचरा डेपो विरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकवटले असून तीव्र आंदोलन करू, मात्र कोणत्याही स्थितीत येथे कचरा डेपो होवूच देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थ व राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

कोरेगाव भीमा (पुणे): पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील कचरा डेपो विरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकवटले असून तीव्र आंदोलन करू, मात्र कोणत्याही स्थितीत येथे कचरा डेपो होवूच देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थ व राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

या कचरा डेपोला माझ्यासह येथील जनतेचा तीव्र विरोध असून कचरा डेपो रद्द करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी सांगितले. पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील वनविभागाच्या जागेत कचरा डेपो उभारण्याबाबत सरकारकडून सुरू झालेल्या वेगवान हालचालीमुळे ग्रामस्थांत संताप आहे. प्रस्तावित कचरा डेपोचे धोके सांगूनही सरकार हि बाब गांभीर्याने घेत नसल्याने या विरोधात स्थानिक एकवटले आहेत.

या बाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी अष्टापूर फाटा, पिंपरी सांडस व पंचक्रोशीतील ग्रामस्थाची बैठक शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, हवेली तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र पायगुडे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, भाजप कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भोंडवे, माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, सरपंच राजेंद्र भोरडे, वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्याम गावडे, अष्टापुर सरपंच नितीन मेमाणे भाजप सहकार आघाडी अध्यक्ष श्यामराव कोतवाल, पिंपरी सांडसचे उपसरपंच अनिल काळे, यशवंतचे माजी संचालक श्रीहरी कोतवाल, ज्ञानेश्वर ठोंबरे, कुंडलिक थोरात, वाल्मीकराव भोरडे, प्रकाश भोरडे, शंकर मांडे, सोमनाथ भोरडे, विपुल शितोळे आदींसह प्रमुख गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत ग्रामस्थ तसेच आमदार बाबुराव पाचर्णे, प्रदिप कंद, ज्ञानेश्वर कटके यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी कचरा डेपो विरोधात भुमिका मांडत जनतेसेबत तीव्र आंदोलनात सहभागी होण्याचा गर्भित इशारा दिला. बाळासाहेब भोरडे यांनी सुत्रसंचालन केले, तर कुंडलिक थोरात यांनी आभार मानले.

Web Title: Pimpri Sandas gathering villagers against garbage depot