सांगवी रुग्णालयात सुविधांची वानवा 

दीपेश सुराणा 
मंगळवार, 27 मार्च 2018

पिंपरी - सांगवी येथील रुग्णालयाला सध्या विविध वैद्यकीय सुविधांची प्रतीक्षा आहे. छोट्याशा जागेत असलेल्या या रुग्णालयात महिलांच्या प्रसूतिगृहाची प्रामुख्याने व्यवस्था आहे. मात्र, सोनोग्राफी आणि तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी महिलांना सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जावे लागते. 

सांगवी रुग्णालय दृष्टिक्षेप : 

पिंपरी - सांगवी येथील रुग्णालयाला सध्या विविध वैद्यकीय सुविधांची प्रतीक्षा आहे. छोट्याशा जागेत असलेल्या या रुग्णालयात महिलांच्या प्रसूतिगृहाची प्रामुख्याने व्यवस्था आहे. मात्र, सोनोग्राफी आणि तातडीच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी महिलांना सांगवी फाटा येथील पुणे जिल्हा रुग्णालय किंवा महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात जावे लागते. 

सांगवी रुग्णालय दृष्टिक्षेप : 

 • क्षमता : 16 खाटा 
 • बाह्यरुग्ण विभागात स्त्री रोग, बालरोग, मेडिसीन व विविध उपचारांची प्राथमिक तपासणी 
 • रोज तपासले जाणारे रुग्ण : 300 
 • महिलांच्या नैसर्गिक प्रसूतीची सोय 
 • शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या महिलांच्या प्रसूतीसाठी (सीझर) दुपारी दोनपर्यंत सुविधा; सुट्टीच्या दिवशी बंद 
 • पाणी व स्वच्छतागृहाची व्यवस्था 

या सुविधा व्हायला हव्यात : 

 • सोनोग्राफी, एक्‍स-रे, एनएसटी मशिनची सोय  अतिदक्षता (आयसीयू) आणि नवजात बालकांचा अतिदक्षता (एनआयसीयू) विभाग
 • विविध उपचारांवरील शस्त्रक्रियेची सोय 
 • हाडांचे विकार, कान, नाक, घसा आदींशी संबंधित आजारांवर उपचार 
 • तातडीची प्रसूती शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था 
 • डॉक्‍टर, परिचारिका, सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे 
 • निवासी डॉक्‍टरांवरील कामाचा ताण कमी करावा 

जुनी सांगवी येथील गजानन महाराज मंदिराजवळील भाजी मंडई बंद स्थितीत पडून आहे. त्या जागेत 50 ते 100 खाटांचे रुग्णालय उभारता येईल. रुग्णालयाच्या सध्याच्या जागेत देखील बांधकाम करून विस्तार करणे शक्‍य आहे. या दोन्ही पर्यायांबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा चालू आहे. 
- माई ढोरे, नगरसेविका 

येथील भाजी मंडई सध्या वापराशिवाय पडून आहे. संबंधित जागेत सांगवी रुग्णालयाचा विस्तार करता येऊ शकतो. त्यासाठी आवश्‍यक ठराव एप्रिल महिन्यात मंजूर करून घेण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. महापालिका प्रशासनाकडे सध्या त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
-संतोष कांबळे, नगरसेवक 

रुग्णालयामध्ये तातडीची प्रसूती शस्त्रक्रिया करण्याची सोय हवी. सध्या असे 
रुग्ण उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविले जातात. त्याशिवाय, 
रुग्णालयात सोनोग्राफीची सोय व्हायला हवी. 
-हीना शेख, रुग्ण 

रुग्णालयात मर्यादित जागा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांना विविध 
वैद्यकीय सुविधा देण्यासाठी मर्यादा पडतात. तरीही, रुग्णांसाठी आवश्‍यक सुविधा वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
- पी. एच. ताडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी 

Web Title: pimpri sangvi hospital maternity