
Summary
थेरगावमध्ये २२ वर्षीय तरुणीवर पतीने तलाक न दिल्याच्या रागातून ब्लेडने जीवघेणा हल्ला केला.
हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपी सलमान रमजान शेख आणि हुजेफा आबेद शेख यांना काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तलाक देत नाही म्हणून एका तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा प्रकार थेरगाव येथील एम. एम. चौकात भरसकाळी घडला.