पीरसाहेबांच्या उरुसानिमित्त दरोडीत भाविकांची गर्दी

युनूस तांबोळी
सोमवार, 15 एप्रिल 2019

टाकळी हाजी: पारनेर तालुक्‍यातील दरोडी येथील ख्वाजा पीर शेख बहाऊद्दीन चिश्‍ती यांचा चार दिवसांचा उरूस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उरुसासाठी राज्यभरातून भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. बुधवारी (ता. 10) रात्री संदल काढण्यात आला होता. या वेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पीरसाहेबांच्या दर्गा व परिसरात विद्युत रोषणाईने उजळला होता.

उरुसासाठी गुरुवारी (ता. 11) भाविक मुक्कामास येण्यास प्रारंभ झाला. रात्री अम्मी हुजूर का चिरागॉ वाजत गाजत काढण्यात आला. या वेळी शिरूर, पारनेर व जुन्नर तालुक्‍यांतील वादकांनी ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम सादर केला. या वेळी नव्या पद्धतीच्या बहारदार सनई वादनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. शुक्रवारी (ता. 12) मुख्य यात्रेला प्रारंभ झाला. या दिवशी मुक्कामास येणारे भाविक कंदोरीयाचा (मांसाहारी जेवण) कार्यक्रम करतात. जुम्माचे नमाज पठण असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक दुपारी एकत्रित आले होते. वाजत गाजत नैवेद्य व शेरे चढविण्याचा कार्यक्रम पार पडला. हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान असल्याने याठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री छबिना व शोभेचे दारूकाम केले होते. यांत्रिकी पाळणे व विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटलेली होती. शनिवार (ता.13) सकाळी कुरआनखानी व जीयारतचा कार्यक्रम पार पडला. या वेळी दर्गामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. पारनेर पोलिस स्टेशन येथे बंदोबस्त पार पाडला. उरुस व्यवस्थित पार पाडण्यासाठी शेख बहाउददीन ट्रस्टचे कार्यकर्ते कार्यरत होते.

Web Title: pirsaheb yatra at parner taluka nagar