Shirur NewsSakal
पुणे
Shirur News : शिरूर पोलिसांची कारवाई; दोन तरुणांकडून तीन पिस्तुले आणि दहा काडतूसे जप्त
Illegal Firearms : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलिसांनी आमदाबाद फाट्यावर कारवाई करत गावठी पिस्तुले आणि जिवंत काडतूसांसह दोन तरुणांना अटक केली.
शिरूर : शिरूर - पाबळ रस्त्यावरील आमदाबाद फाटा (ता. शिरूर) परिसरात पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले आणि दहा जिवंत काडतूसे जप्त केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री शिरूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने परिसरात खळबळ उडाली.