'सकाळ'च्या बातमीचा परिणाम : बारामती-इंदापूर राज्यमार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरवात

राजकुमार थोरात
Sunday, 11 October 2020

बारामती-इंदापूर राज्यमहामार्गावरील खड्यामध्ये युवकांनी झाड लावून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यमार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे.

वालचंदनगर : बारामती-इंदापूर राज्यमहामार्गावरील खड्यामध्ये युवकांनी झाड लावून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यमार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती -इंदापूर राज्यमार्गावरील काटेवाडी ते इंदापूरपर्यत रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे खड्यात रस्ता की रस्त्यामध्ये खड्डे अशी परस्थिती निर्माण झाली असल्यामुळे सणसर गावचे माजी उपसरपंच श्रीनिवास कदम, अभयसिंह निंबाळकर, इंदापूर खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, सचिन भाग्यवंत यांनी गेल्या आठवड्यामध्ये काटेवाडीमध्ये रस्त्याच्या मध्यभागीच्या खड्डात झाड लावून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले होते.

याची बातमी शुक्रवार पासुन (ता. ९) रोजी सकाळ वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसिद्ध झाल्यानंतर बांधकाम विभागाने तातडीने शुक्रवार पासुन काटेवाडी गावापासून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे.

डीएसके प्रकरण : उलाढालीचा रिपोर्ट अडकला लालफितीत; तपास यंत्रणेकडून दिरंगाई

रस्त्यावरील खड्डे बुजविल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. शनिवार (ता.१०) रात्री पासुन इंदापूर-बारामती तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने सुरवात केली असून पावसामुळे खड्डे बुजविण्याच्या कामामध्ये अडथळा येवू लागला आहे. बारामती ते इंदापूर राज्यमार्ग लवकरच संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये समाविष्ठ होणार असून संपूर्ण रस्त्याचे कामच नव्याने होणार आहे. महामार्गाची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे काम सुरु आहे.

आईसोबत बोलत थांबलेल्या तरुणावर हल्ला; तिघांनी लोखंडी सळईने केले वार​

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pits are being filled on Baramati-Indapur state highway