विविध गुन्हे दाखल असलेल्या महिलेवर एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या महिलेवर पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
Crime
CrimeSakal

पुणे - विविध प्रकारचे गंभीर गुन्हे (Crime) दाखल असलेल्या महिलेवर (Women) पोलिसांनी (Police) महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. मागील अकरा महिन्यात 35 गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी "एमपीडीए'ची कारवाई केली आहे.

रेश्‍मा बापू भालशंकर (वय 45, रा. आंबेडकर नगर, येवलेवाडी व कोंढवा खुर्द) असे कारवाई केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्‍मा भालशंकर हि पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. संबंधीत महिला हि सरकारी जमीन कोणत्याही सरकारी दस्तऐवजाशिवाय विक्री करून स्वतःचा आर्थिक फायदा करण्याच्या उद्देशाने लोकांची फसवणूक करीत होती. त्यामध्ये ती संबंधित नागरीकांना दमदाटी, शिवीगाळही करीत होती. त्याचबरोबर तिने तिच्या साथीदारांच्या मदतीने कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गरीब, गरजू लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन खंडणी, फसवणूक, दंगा यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. तिच्याविरुद्ध 4 गुन्हे दाखल आहेत.

Crime
धक्कादायक! आर्थिक कारणातून पतीने केला पत्नीचा खून

तिच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत होती. त्यामुळे कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी संबंधीत महिलेविरुद्ध "एमपीडीए'नुसार कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी करून पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधीत प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानुसार, महिलेविरुद्ध 27 ऑगस्ट 2021 पासून एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com