बाजारातून जाता जाईनात प्लॅस्टिक पिशव्या...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पुणे - ‘खरेदी केलेल्या कॅरीबॅग आता टाकून तरी कुठे द्यायच्या,’ असे म्हणत विक्रेते आता सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करत असल्याचे बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागांत दिसले. ग्राहकही या पिशव्यांचा वापर करताना दिसत आहेत. 

पुणे - ‘खरेदी केलेल्या कॅरीबॅग आता टाकून तरी कुठे द्यायच्या,’ असे म्हणत विक्रेते आता सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करत असल्याचे बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागांत दिसले. ग्राहकही या पिशव्यांचा वापर करताना दिसत आहेत. 

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी राज्यात प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने घेतला. त्या आधारावर राज्यात एप्रिलपासून प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचे उत्पादन, वितरण आणि विक्री बंद करण्यात आली; पण शहराच्या वेगवेगळ्या भागांत कॅरीबॅग दिसत आहेत. भाजीपाल्यापासून फरसाणपर्यंत आणि स्वीट मार्टपासून किराणा मालापर्यंतच्या दुकानांमधून माल प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये दिला जात असल्याचे दिसते. 

‘‘प्लॅस्टिक पिशव्यांना सरकारने पर्याय उपलब्ध केला पाहिजे. कागदी पिशव्या तकलादू आहेत. त्यातून माल घेऊन जाऊ शकत नाही. ग्राहक नेहमी कापडी पिशवी आणेलच असे नाही. ग्राहकही कापडी पिशवीचे जास्त पैसे द्यायला नाराज असतो,’’ अशी माहिती विक्रेते सचिन बुटाला यांनी दिली. स्वीट मार्ट चालक म्हणाले, ‘‘कॅरीबॅग खरेदी केल्या आहेत. त्यांचे करायचं काय, असा प्रश्‍न पडतो म्हणून त्यात माल घालून ग्राहकांना देतो.’’

हॉटेल व्यावसायिकांनी पार्सलसाठी स्वतंत्र उपाययोजना केली आहे; तसेच ज्यूस, मिल्कशेक यासाठी जैवविघटक स्ट्रॉ वापरण्यात येत आहे, असे. हॉटेल व्यावसायिक राजेश शेट्टी यांनी सांगितले.

प्लॅस्टिक बंद झाल्यानंतरही केरात प्लॅस्टिकच्या काळ्या पिशव्या दिसून येत आहेत. त्याची विक्री बाजारात होत असल्याने त्या केरामध्ये येतात. पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी स्वतःहून काही बंधने घालून घेतली पाहिजेत. त्यात प्लॅस्टिकचा वापर बंद करणे, हा एक मोठा भाग आहे.
- हर्षद बरडे, संचालक, स्वच्छ संस्था

Web Title: Plastic Bag Ban Market