प्लॅस्टिकबंदी निर्णयाची महापालिकेतही अंमलबजावणी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पिंपरी - शहरात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी महापालिकेतर्फे केली जात आहे. ही कारवाई करणाऱ्या महापालिकेतच प्लॅस्टिकचा वापर होत असल्यास "दिव्याखाली अंधार' असे चित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्याबाबत आवश्‍यक दक्षता म्हणून महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर करण्यास बंदी घातली आहे. तसेच, त्याचा वापर आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

राज्य सरकारने महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा 2016 आणि प्लॅस्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना -2018 अंतर्गत प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक व थर्मोकोलपासून बनविण्यात येणाऱ्या डिस्पोजेबल वस्तू (एकदाच वापरल्या जाणाऱ्या) वापरण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महापालिका कार्यालयांमध्ये करण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिली आहे. 

पावणेदोन लाखाचा दंड वसूल 
शहरात एप्रिल, मे आणि जून महिन्यांत आत्तापर्यंत प्लॅस्टिक बंदीच्या केलेल्या कारवाईत व्यावसायिकांकडून 1 लाख 80 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच, सर्व क्षेत्रीय कार्यालयातर्फे विविध ठिकाणी विशेष मोहीम राबवून 1400 किलो प्लॅस्टिक जमा केले. 
 
Web Title: Plastic ban decision has also been implemented in the municipal corporation