#PlasticBan जनतेमध्ये जागृतीसाठी प्लॅस्टिक बंदीवर कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पुणे : पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लॅस्टिकवर बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कॅरी बॅग वापरू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सहसंचालक डॉ. वाय. बी. सोनटक्के यांनी बुधवारी येथे केले. 

पुणे : पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लॅस्टिकवर बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कॅरी बॅग वापरू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सहसंचालक डॉ. वाय. बी. सोनटक्के यांनी बुधवारी येथे केले. 

राज्यात सुरू झालेल्या प्लॅस्टिक बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे करण्यात येत आहे. पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना या कायद्याची सविस्तर माहिती देण्यासाठी, तसेच प्रत्यक्ष कारवाई करताना येणाऱ्या त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. "एमपीसीबी' बरोबरच "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्मेंट', "वेस्ट मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च सेंटर' यांच्यातर्फे यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी "एमपीसीबी'चे प्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे उपस्थित होते.  

नवीन नियमांची माहिती आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी ही कार्यशाळा असल्याचे डॉ. सोनटक्के यांनी सांगितले. ते म्हणाले, ""प्लॅस्टिक बंदी ही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आहे, या बाबत जनतेमध्ये जागृती करण्यात येत आहे. थेट लोकांमध्ये जाऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या कायद्याची सविस्तर माहिती असणे आवश्‍यक आहे. या कार्यशाळेतून त्यांना ही माहिती देण्यात आली.'' प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी करताना दंड कसा आकारायचा, नेमक्‍या कोणत्या गोष्टी प्लॅस्टिक बंदीतून वगळण्यात आल्या आहेत, याची माहिती यात देण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली. 

Web Title: Plastic ban workshop for awareness among the people