पार्सल नेण्याचे प्रमाण घटले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पिंपरी - प्लॅस्टिकबंदीमुळे अडीच महिन्यांत हॉटेल, डायनिंग हॉलमधून पार्सल नेण्याच्या प्रमाण घटले आहे. यामुळे व्यवसायात 30 ते 40 टक्के घट झाली आहे. 

राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीला तीन महिने पूर्ण होत आले आहेत. या कालावधीत बहुसंख्य नागरिकांमध्ये जनजागृती झाली आहे. प्लॅस्टिकबंदीचे बहुसंख्य नागरिकांनी स्वागत केल्याचे दिसते. बंदीनंतर काही विक्रेत्यांनी दही, दूध, रबडी यांसारखे पदार्थ घेण्यासाठी डबे घेऊन येण्याची तयारी ठेवावी, असे फलक दुकानांमध्ये लावले होते. त्याचाही परिणाम दिसू लागला आहे. 

मोठे हॉटेल व्यावसायिक ऍल्युमिनिअमच्या कंटेनरमध्ये पातळ भाजी, भात आणि कागदामध्ये रोटी देत आहेत. डायनिंग हॉल, छोटे खानावळ व्यावसायिकांनीही ग्राहकांना डबे घेऊन येण्याच्या दिलेल्या सूचनांचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. परंतु त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. 

चिंचवड येथील डेअरी व्यावसायिक शंतनू कोरे म्हणाले, ""वटाणा, पनीर आम्ही खाकी पिशव्यांमध्ये तर दही, दूध हे डब्यांमध्ये देतो. लस्सीसाठी प्लॅस्टिकऐवजी आइस्क्रीमच्या लाकडी चमच्यांचा वापर सुरू केला आहे.'' 

18 वर्षे हॉटेल व्यवसाय करणारे लखन कबाडे म्हणाले, ""बंदीमुळे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा किलोचा दर 180 रुपये झाला. आम्ही पार्सल देणेच बंद केले आहे.'' 

दूध विक्रेत्यांनी ग्राहकांना स्टीलच्या किटल्यांमधून दूध देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे किटल्यांच्या मागणीत 25 टक्के वाढ झाली, अशी माहिती चिंचवड येथील स्टीलच्या वस्तूंचे विक्रेते वाघाराम चौधरी यांनी सांगितले. 

चिंचवड येथील डायनिंग हॉलचालक शेखर खरे म्हणाले, ""ग्राहक आता पार्सलसाठी डबे आणू लागले आहेत. लांबून येणाऱ्या ग्राहकांची बंदीमुळे मोठी गैरसोय झाली आहे.'' 

शहरातील मोठी हॉटेल : 250 
शहरातील लहान हॉटेल : 500 
पार्सल व्यवसायात झालेली घट : 40 टक्के (स्रोत - पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशन) 

पार्सलसाठी डबे घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. पोळ्या किंवा रोटी कागदात देण्यात येतात. 
- पद्मनाभ शेट्टी - अध्यक्ष - पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशन 

Web Title: Plastic bans have reduced the number of parcel carts from the hotel