प्लॅस्टिक विक्री रोखण्यासाठी एमपीसीबी, महापालिकेची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे - शहरात खुलेआम होणारी प्लॅस्टिक विक्री रोखण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महापालिका यांच्यातर्फे ही संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. 

शहरात सर्रास प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा वापर होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने गुरुवारी (ता.२७) प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेत ‘एमपीसीबी’ने ही कारवाई हाती घेतली. राज्यात एप्रिलपासून प्लॅस्टिकच्या वापरास बंदी घातली आहे. त्यात प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगसह प्लॅस्टिकचे चमचे, स्ट्रॉ, ताटे यांचा समावेश होता. त्यांच्या वापरावर बंदी घालून सहा महिने उलटले आहेत.

राज्यातून प्लॅस्टिकचा वापर रोखण्यासाठी उत्पादकांवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे विभागातील शंभरावर कारखान्यांना टाळे ठोकले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बाजारातील प्लॅस्टिकविरोधातील मोहीम राबविण्यात येत आहे. 

‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर म्हणाले, ‘‘राज्यातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लॅस्टिकवर बंदी घातली आहे. मात्र, त्यानंतरही बाजारात काही ठिकाणी होणारी प्लॅस्टिकची विक्री रोखण्यासाठी १४ स्वतंत्र पाहणी पथके तयार केली आहेत. शहरातील काही भागांमध्ये प्लॅस्टिकची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर प्राधान्याने ही कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी तयार केलेल्या पथकांमध्ये उपप्रादेशिक अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.’’

राज्यातील प्लॅस्टिक विक्री होत असल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागणार आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनाही समाविष्ट करून घेण्यात येणार असून, या संस्थांनी आपल्या प्रतिनिधींबाबत माहिती कळवावी, असे पत्र मंडळातर्फे पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, सोलापूर आणि सातारा जिल्हाप्रमुखांना देण्यात आले आहे. 
- दिलीप खेडकर, एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी  

Web Title: Plastic Sailing Control MPCB Municipal Campaign