नाट्यसमीक्षक वि.भा. देशपांडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

संपादित व स्वतंत्र अशी एकूण 43 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. 

पुणे : ज्येष्ठ नाट्य समीक्षक व लेखक वि. भा. देशपांडे यांचं आज (गुरुवारी) निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. पुण्यातील एरंडवणे येथील राहत्या घरी दुपारी 12 वाजता त्यांचे निधन झाले. 

सायंकाळी 4 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात 35 वर्षे मराठी आणि नाट्यशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी अनेक पुस्तके संपादित केली, तसेच स्वतंत्र लेखन केले. संपादित व स्वतंत्र अशी एकूण 43 पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. 

मराठी नाट्यकोश- मराठीतला आणि भारतीय स्तरावरचा पहिला नाट्यकोश, 'मराठी नाटक- नाटककार काळ आणि कर्तृत्व' याचे 3 खंड, रंगयात्रा, आचार्य अत्रे : प्रतिमा आणि प्रतिभा, पु.ल. पंच्याहत्तरी, गाजलेल्या रंगभूमिका, माझा नाट्यलेखन- दिगदर्शनाचा प्रवास अशी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. निळू फुले- व्यक्ती, कार्यकर्ता, कलावंत या पुस्तकाचे त्यांनी संपादन केले. 
 

Web Title: play critique vi. bha. deshpande passes away