नाट्यसृष्टीतील महान रंगकर्मी इब्राहिम अल्काजी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

नाट्यसृष्टीतील एक महान रंगकर्मी इब्राहिम अल्काजी (वय 94) यांचे दिल्लीत‌ ह्रदयविकाराने आज निधन झाले.

पुणे : नाट्यसृष्टीतील एक महान रंगकर्मी इब्राहिम अल्काजी (वय 94) यांचे दिल्लीत‌ ह्रदयविकाराने आज निधन झाले. त्यांच्यावर राजधानीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अल्काजी यांचा जन्म पुण्यात झाला होता.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या अल्काजी यांनी गिरीश कर्नाड यांचे तुघलक आणि धर्मवीर भारती यांचे अंध युग अशा नाटकांची निर्मिती केली. नाट्य आणि चित्रपटसृष्टील अनेक कसदार कलाकार त्यांनी घडविले. महान आणि कडक शिस्तीचे शिक्षक अशी देखील त्यांची ओळख होती.

त्यांचे अल्काजी यांचे मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचा‌ जन्म पुण्यात एका सौदी अरेबियातील धनाढ्य व्यावसायिकाच्या घरात झाला होता. त्यांचे शिक्षण पुण्यातील सेंट व्हिन्सेट आणि मुंबईतील सेंट‌ झेव्हियर शाळेत झाले. अरबी, इंग्रजी, मराठी आणि गुजराती भाषा त्यांना अवगत‌ होत्या. मुंबईत शिक्षण घेत असताना ते एका थिएटर ग्रूपशी जोडले गेले. नंतर त्यांनी लंडनमधील रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रामाटिक आर्टमध्ये नाट्यशिक्षण घेतले. 

नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्यासह अनेक पिढ्यांतील कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले. कोणत्याही नाटकाची निर्मिती करण्यापूर्वी विषयाचा विस्तृत आवाका मांडण्यासाठी प्रचंड संशोधन करणे हा त्यांचा विशेष गुण होता. आषाढ का एक दिन तसेच शेक्सपिअरसह परकी भाषेतील नाट्यविष्कार त्यांनी रंगमंचावर आणले होते.

आणखी वाचा - शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ख्यातनाम नाट्यकर्मी व नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक पद्मविभुषण इब्राहीम अल्काझी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. इब्राहीम अल्काझी हे वैश्विक दृष्टीकोन लाभलेले नाट्यकर्मी होते. ते प्रतिभासंपन्न कलाकार, कलाप्रेमी व गुरु होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालक पदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष देतात. त्यांच्या निधनाने भारतीय कला नाट्य क्षेत्राने एक अद्भुत रत्न गमावले आहे, असे कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.    
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Playwright Ibrahim Alkaji passes away