फळांच्या बिया कचऱ्यात न टाकता आमच्याकडे द्या!

रमेश मोरे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : सध्या विविध फळांचा हंगाम सुरू असुन शहरी भागात विविध प्रांतातील फळे पहावयास व चाखावयास मिळतात. सध्या आंबा, सिताफळ यांचा हंगाम असुन आपण घरी आणलेल्या फळांच्या बिया कचऱ्यात न टाकता आमच्याकडे संकलित कराव्यात असे आवाहन येथील कै.चंद्रभागा भोसले प्रतिष्ठान व ओम साई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिष्ठानचे संजय मराठे व दत्तात्रय भोसले म्हणाले,आपल्याकडे उपलब्ध नसलेली फळे विविध भागातुन परिसरात विक्रिसाठी येत असतात. यात जांभळ, फणस, करवंद, सिताफळ, आंबा व रानमेव्याचा समावेश असतो. फळांचे विविध प्रकार या हंगामात पहावयास मिळतात. घरी आणलेल्या फळातील  बिया टाकुन न देता, आमच्याकडे द्याव्यात असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

संकलित झालेल्या बिया परिसरात व पंढरपुर वारीच्या मार्गावर लावण्यात येणार असल्याचे दत्तात्रय भोसले यांनी सांगीतले. याचबरोबर ज्यांना आमच्याकडे बिया आणुन देणे शक्य होणार नाही त्यांनी ९३२६८५२१५५ या  क्रमांकावर संपर्क करावा.आम्ही घरी येवुन बिया संकलित करू अशी माहीती  प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: please collect seeds of fruits, dont waste

टॅग्स