पंतप्रधान पुण्यात येतायत; वाहतुकीत काय बदल झाले आहेत?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पुणे : शहरातील मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) पुण्यात येत आहेत. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

पंतप्रधानांच्या दौर्‍यातील प्रवासाविषयीची माहिती पोलिसांनी गोपनीय राखली आहे; मात्र पंतप्रधानांच्या आगमनावेळी त्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद राहील, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, सर्वसामान्य पुणेकरांना मात्र वाहतूक व्यवस्थेत काय बदल होणार यासंदर्भात पुरेशी माहिती मिळालेली नाही. ट्विटरवर यासंदर्भात अनेक युझर्सने वाहतूक पोलिसांकडे चौकशी केली आहे. 'अद्याप वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल झालेले नाहीत. पण पंतप्रधान मोदी पुण्यात येतील, तेव्हा तात्पुरते बदल होतील', असे उत्तर वाहतूक पोलिसांकडून दिले जात आहे.

Web Title: PM arrives in Pune; What are the changes in traffic?