"कोरोनाच्या आणि आता युक्रेनमधील युद्धाच्या संकटातून लोकांना बाहेर काढलं"

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते.
PM Narendra Modi In Pune
PM Narendra Modi In PuneTeam eSakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे मेट्रोसह (Pune Metro) विविध विकास कामांचं लोकार्पण त्यांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केलेल्या भाषणात मेट्रोच्या कामासह मोदी सरकारच्या काळात झालेल्या वेगवेगळ्या विकास कामांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. भाजप सरकारच्या काळात विकास कामांचं उद्घाटन होतं आणि ती पुर्णही होतात. 2014 पूर्वी विकास असं होत नव्हतं असं म्हणत मोदींनी विरोधकांलवर टीका केली. तसंच त्यांनी यावेळी कोरोना काळात केलेल्या कामांसह रशिया-युक्रेन वादात भारतीयांना सोडवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याचं सांगितलं.

PM Narendra Modi In Pune
PM Modi In Pune: कसा होता PM मोदींचा पुणे दौरा; वाचा सगळे अपडेट्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही COVID काळात आणि आता युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या काम केलं. आपल्या लोकांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. मोठ्या देशांनाही आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अडचणी येत आहे, परंतु भारताची वाढती ताकद आहे की, 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं.

PM Narendra Modi In Pune
Pune Metro धावली; प्रवाशांनी लुटला पहिल्या फेरीचा आनंद; पाहा व्हिडिओ

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या टीकेला आपल्या भाषणावेळी उत्तर दिलं. मोदींना सांगू इच्छितो की, 2006 ला भूमिपूजन आणि 2014 मध्ये मनमोहन सिंगाच्या हस्ते मुंबई मेट्रोचं उद्घाटन झालं असं अजित पवार म्हणाले. तसंच त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच राज्यपालांना सुनावलं आहे. अजित पवार म्हणाले की, मला पंतप्रधान याना लक्षात आणून द्यायच आहे की काही मान्यवर व्यक्तीकडून अनावश्यक वक्तव्य केले जात आहेत ते महाराष्ट्राला परवडणारे नाही त्यामुळं याकडेही लक्ष द्यावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com