पंतप्रधान मोदींनी पुण्यात घेतली 20 वर्षे जुन्या मित्राची भेट

टीम ई-सकाळ
रविवार, 8 डिसेंबर 2019

पुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांची भेट घेतली. शौरी सध्या पुण्यात वास्तव्यास असून, एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. पंतप्रधान मोदी आणि अरुण शौरी यांच्यात गेल्या 20 वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात शौरी यांनी राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती.

पुणे : पोलिस महासंचालक परिषदेच्या निमित्तानं पुण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांची भेट घेतली. शौरी सध्या पुण्यात वास्तव्यास असून, एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. पंतप्रधान मोदी आणि अरुण शौरी यांच्यात गेल्या 20 वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात शौरी यांनी राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. 2010पर्यंत ते राज्यसभा सदस्य होते. मधल्या काळात शौरी यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन मित्रांमध्ये मनमोकळ्या गप्पा 
एकेकाळी भाजपचे राज्यसभा सदस्य राहिलेले अरुण शौरी सध्या पुण्यात लवास सिटीमध्ये वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची विचारपूस केली. या संदर्भात रुबी हॉस्पिटलकडून माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, हॉस्पिटलला भेट देऊन, अरुण शौरी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी शौरी यांच्यावरील उपचारांबाबत डॉ. सचिन गांधी, डॉ. प्राची साठे आणि डॉ. पी. के. ग्रँट यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी शौरी यांची त्यांच्या विशेष रुममध्ये जाऊन भेट घेतली. दोघांनी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या. दोघांनी काही काळ एकांतातही चर्चा केली. दोघांमध्ये जवळपास 20 वर्षांची मैत्री आहे. त्या या मैत्रीपूर्ण संबंधांमुळेच दोघांनी काही हलके-फुलके क्षण हॉस्पिटलमध्ये घालवले. पंतप्रधान मोदी यांनी शौरी यांची बहीण नलिनी सिंह आणि भाचे सुकरण सिंह यांच्याशीही संवाद साधला. 

आणखी वाचा - पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी भुजबळ पोहोचले; कारण?

आणखी वाचा - काय आहेत दिवसभरातील पाच महत्त्वाच्या घडामोडी

अरुण शौरीवर उपचार
गेल्या सहा दिवसांपासून अरुण शौरी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सामान्य असून, ते दैनंदिन कामे स्वतःच करत आहेत. त्यांच्या सर्व चाचण्या आणि सिटी स्कॅनचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. केवळ त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवता यावे, यासाठी त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती रुबी हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi meet veteran journalist arun shourie at hospital in pune