esakal | डॉक्टरांची राहण्याची सोय केलेल्या हॉटेलांची ११ कोटींची बिल थकली
sakal

बोलून बातमी शोधा

 pmc 11 crore bill pending Hotels with doctor accommodation

पैशांसाठी ‘पीएचए’ आणि ‘एचआरएडब्ल्यूआय’चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा

डॉक्टरांची राहण्याची सोय केलेल्या हॉटेलांची ११ कोटींची बिल थकली

sakal_logo
By
सनील गाडेकर

पुणे : डॉक्‍टरांसह वैद्यकीय कर्मचा-यांना राहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या हॉटेलांची सुमारे ११ कोटी रुपयांची बिले गेल्या नऊ महिन्यांपासून थकली आहेत. त्यामुळे आधीच गोत्यात आलेले हॉटेल व्यावसायिक आणखी हवालदिल झाले आहेत.  वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्यांच्या घरातील व्यक्ती सुरक्षित राहाव्यात म्हणून शासकीय रुग्णालयातील स्टाफची ससून रुग्णालय परिसरातील २४ हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. या हॉटेलांमधील सुमारे ७०० रूम्स एप्रिल ते ऑक्टोंबर दरम्यान भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. तेथे थांबणा-याची जेवणापासून सर्व व्यवस्था हॉटेल व्यवस्थापनाकडून करण्यात आली होती. त्याची सुमारे ११ कोटी रुपयांची थकबाकी जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे. हे पैसे मिळावेत म्हणून ‘द हॉटेल अँड रेस्टोरेन्ट्‌स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया’ (एचआरएडब्ल्यूआय) आणि ‘द पूना हॉटेलियर्स असोसिएशन’ (पीएचए) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करीत आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार हे हॉटेल उपलब्ध करून देण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा प्रशासनाने ठरवलेल्या दरानुसार हे हॉटेल उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याच्या मोबदला अजून आम्हाला मिळाला नाही. चांगल्या हेतूने घेतलेल्या निर्णयाची अशी झळ बसावी हे दुर्दैवी आहे. सरकारी आदेशानुसार सर्व काही बंद असताना हॉटेल्स सगळ्या सोयींसह उघडावी लागली होती. कित्येक हॉटेल्स आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे थकबाकी लवकर मिळावी, अशी आमची मागणी असल्याचे ‘पीएचए’ने सांगितले.

''हॉटेलांनी पुरवलेल्या सेवांचा योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता हॉटेल्सनी हा प्रस्ताव मान्य केला. त्यानुसार हॉटेल कर्मचाऱ्यांचे पगार, विजेची बिल, व्यवस्थापन व देखरेखीचा सर्व खर्च हॉटेल मालकांनी स्वतः उचलला. मात्र अद्याप त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. आमचा व्यवसाय जवळपास बंदच आहे. त्यामुळे थकीत पैसे मिळाले तर आम्हाला थोडासा दिलासा मिळेल.''
- शरण शेट्टी, अध्यक्ष, पीएचए

पुण्यात ऑक्सिजन न मिळण्याच्या तक्रारी, जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 टोल फ्री नंबर जाहीर

- सर्व हॉटेल ससून रुग्णालय परिसरातील
- २४ मधील तीन हॉटेल पाईव्ह स्टार
- एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत ७०० रूमची सोय
- कर्मचाऱ्यांचा दर्जानुसार हॉटेल उपलब्ध करून देण्यात आली होती

loading image