

PMC initiates immediate action on Shelar Mala stream contamination
Sakal
कात्रज : शेलारमळा परिसरातील ओढ्यात ड्रेनेजचे पाणी मिसळण्याच्या गंभीर समस्येवर सकाळने मल्लनिस्सारण वाहिनीचे पाणी ओढ्यात या मथळ्याखाली वृत्त दिले होते. यानंतर महापालिकेच्या मुख्य खात्याकडून तातडीने कारवाई करत ओढ्याची साफसफाई केली आहे. मुख्य खात्याच्या मल्लनिस्सारण विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी पाहणी करून ओढ्यात अनधिकृतपणे मल्लनिस्सारण वाहिनीचे आणि इतर सांडपाणी सोडणाऱ्या व्यक्तींना नोटीसाही बजावल्या आहेत. काही ठिकाणी फुटलेल्या चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी ओढ्यात मिसळत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यासाठी दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. सकाळच्या बातमीनंतर झालेल्या या तत्पर कारवाईबद्दल स्थानिक नागरिक योगेश शेलार यांनी समाधान व्यक्त केले असून कायमस्वरूपी तोडगा काढून समस्येची पुनरावृत्ती होऊ नये, अशीही मागणी केली आहे.