
पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा मुख्य भाग असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएल) तोटा वाढतच चालला आहे. अशा स्थितीमध्ये महापालिकेने पीएमपीला संचलन तुटीपोटी ३० कोटी ८० लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.