संकुचित वृत्ती टाळा - पवार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे - ""आपण कसे दिसावे; कसे रहावे, हे ठरविण्याचे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असते. तरीदेखील काही व्यक्ती इतरांवर त्यांच्या दिसण्यापासून ते वेशभूषेवरून टीका करतात. विशेषत: महिलांच्या बबातीत या टीकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. लोकांच्या मनात असा संकुचित विचार येतोच कसा?,'' असा प्रश्‍न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. 

महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण बुधवारी करण्यात आले. या वेळी ते बोलते होते. 

पवार म्हणाले,""इतरांनी कसे वागावे; कसे राहावे हे सांगणे चुकीचे आहे. लोकांनी ही वृत्ती बदलण्याची गरज आहे.'' 

कृष्णकांत कुदळे यांना महात्मा जोतिबा फुले पुरस्कार, रझिया पटेल यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, रागिणी शेखर यांना संत मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बिशप थॉमस डाबरे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महापौर प्रशांत जगताप, कमल ढोले-पाटील, दीप्ती चौधरी, अश्विनी कदम, नंदा लोणकर, रवी चौधरी उपस्थित होते.

Web Title: pmc award