
गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने सर्वांगीण विकास होऊन मूलभूत प्रश्न सुटतील, अशी भावना येथील ग्रामस्थांची आहे.गावाचे झपाट्याने होणारे नागरिकरण व अनधिकृत बांधकामांची वाढ, ही या गावची डोकेदुखी ठरली आहे.
मांजरी बुद्रूक गाव १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाले होते, मात्र ते पुन्हा वगळण्यात आले. त्यामुळे या गावचा विकास रखडला. पुन्हा गाव महापालिकेत समाविष्ट झाल्याने सर्वांगीण विकास होऊन मूलभूत प्रश्न सुटतील, अशी भावना येथील ग्रामस्थांची आहे. गावाचे झपाट्याने होणारे नागरिकरण व अनधिकृत बांधकामांची वाढ, ही या गावची डोकेदुखी ठरली आहे.
२०११ सालच्या जनगणनेनुसार या गावची लोकसंख्या ३६ हजार ८१६ होती, मात्र गेल्या दहा वर्षात ही लोकसंख्या १ लाख २० हजार इतकी झपाट्याने वाढली आहे. गावचे भौगोलिक क्षेत्रफळ १०४८.३४ हेक्टर इतके आहे. गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असल्याने नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. सुमारे ४२ कोटी खर्चून मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली आहे. मात्र त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी कधी मिळणार, हा प्रश्न आहे.
गावात नियमितपणे कचरा उचलला जात नाही, तसेच गोळा केलेल्या कच-याचे विलगीकरण केले जात नाही. साठवलेला कचरा अनेकदा समाजकंटकांकडून पेटवला जातो. त्यामुळे तेथील रहिवाशांना नाहक त्रास होतो. गावात स्वतंत्र कचरा प्रकिया प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे. गावातील बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, मात्र गोपाळपट्टी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे!
सोलापूर रस्त्यावर पंधरा नंबर ते टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूला हातगाडी व फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते, तसेच मांजरी उपबाजार समितीला पार्किंगची सुविधा नसल्याने येथील वाहने सोलापूर रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे याठिकाणी वाहनतळ उभारण्याची आवश्यकता आहे.गावात बहुतांश ठिकाणी सांडपाणी वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. वाढत्या नागरिकरणामुळे त्या कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या वाहिन्या नादुरुस्त झाल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसते.
मुख्यमंत्री पेयजल योजनेतून लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यामुळे गावचा पाणी प्रश्न सुटेल. मांजरीमध्ये ग्रीन झोन आहे, त्याचे निवासी झोनमध्ये समावेश होण्याची आवश्यकता आहे.
- शिवराज घुले, सरपंच
वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल?
ग्रामस्थ म्हणतात...
शैलेंद्र बेल्हेकर - गाव महापालिकेत गेल्याने नियोजित विकास होईल याचा आनंद आहे. महादेवनगर येथे रस्ता रुंदीकरण झाले आहे, मात्र रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढली आहेत. दुकानमालक रस्त्याकडेला बसणा-या नागरिकांकडून भाडे घेतात. अशा व्यावसायिकांची संख्या वाढल्याने याठिकाणी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम
शैला कदम (गृहिणी) - ग्रामपंचायतीकडून पाणी मिळत नसल्याने आम्हाला पाणी विकत घ्यावे लागते, अन्यथा हडपसर येथून महापालिकेच्या टाकीतून पाणी आणावे लागते. त्यामुळे प्राधान्याने पाणीप्रश्न सोडविण्याची आवश्यकता आहे.
राम जाधव (नोकरदार) - ग्रामपंचायतीला आम्ही नियमितपणे कर भरतो. मात्र गावात नियमितपणे कचरा उचलला जात नाही. सक्षम सांडपाणी व्यवस्था नसल्याने काही ठिकाणी सांडपाणी थेट नैसर्गिक नाल्यात व नदीत सोडले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दृष्टिक्षेपात...
१ लाख २० हजार - लोकसंख्या
१०४८.३४ - हेक्टर क्षेत्रफळ
१७ - ग्रामपंचायत सदस्य
११ किलोमीटर - पुणे स्टेशनपासून अंतर
सरपंच - शिवराज घुले
गावाचे वेगळेपण - ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, वसंतदादा शुगर इन्सिट्यूट, शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्रासारख्या संस्थांसह सिरम इन्स्टिट्यूट इंडिया कंपनीचा प्रशस्त प्रकल्प
(उद्याच्या अंकात वाचा शेवाळेवाडी गावाचा लेखाजोखा.)